देवरवाडी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
देवरवाडी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चंदगड/प्रतिनिधी-
ग्रामपंचायत देवरवाडी व प्रिन्स पाईप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रिन्स कंपनीने महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या परिसरातील अन्य मोठ्या कंपन्यांनी याचे भान ठेऊन सामाजिक बांधिलकीतून समाजाची मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतून प्रिन्स पाईप कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वस्तू वाटपवेळी देवरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, सदस्या मंजुळा कांबळे, मनिषा भोगण, प्रभावती मजूकर व ग्रामसेवक नाईक यांच्यासह कंपनीचे एचआर कल्लाप्पा कोकितकर व सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कांबळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments