चळवळीतला दीपस्तंभ...! संजयचा प्रधानचा अस्त...!
चळवळीतला दीपस्तंभ...!
संजयचा प्रधानचा अस्त...!
अशोक कांबळे / साप्ताहिक भीमयान
कुटूंबाचे पालन पोषण करत, स्वतःचे शरीर साथ देत नसतांनाही चळवळीला 24 तास वेळ देणाऱ्या संजय प्रधानचा आकस्मिक मृत्यू झाला...!
त्यांचा आकस्मिक मृत्यु पूर्ण जिल्यातील चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
संजय प्रधानचे गाव म्हणजे कागल तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मूरगुड . मात्र त्यांच्या कार्याने ते संपूर्ण जिल्यातील चळवळीतील कार्यकर्त्याच्या गळ्यातील ताईत बनले होते हे संजयच्या जीवनाचे मोठे रहस्य आणि यश होते हे सर्वांना मान्यच करावे लागेल.
मूरगुड शहरातील सामाजिक सांस्कृतिक, राजकीय, क्षेत्रातील कोणत्याही कार्यात संजय प्रधान हे हक्काचे कार्यकर्ते होते. जेथे कमी तेथे आम्ही असा स्वभाव असणाऱ्या संजय ला कोणाच्याही कार्यक्रमात पुढाकार घेऊन ते कार्य पार पाडण्यात मोठा आनंद वाटत असे हे त्यांचे आदर्शवत कार्य म्हणावे लागेल.
भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी मध्ये ते सक्रीय पदाधिकारी होते, साप्ताहिक भीमयानचे ते मूरगुड चे प्रतिनिधी होते, समता सैनिक दलाचे ते सैनिक होते, आरपीआय पक्षातील सर्वा बरोबरच त्याचे घनिष्ट संबंध होते एवढेच नाही तर ते पक्ष, संघटना मजबूत व्हावेत आणि विश्वभूषण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर याचे स्वप्न साकार होऊदे म्हणून संजय सतत धडपडत होते.
कोणत्याही पदाची, अर्थिक लाभाची अपेक्षा न करता सर्वसामान्य लोकांसाठी सतत धडपडत रहाणे, असे व्यक्तिमत्त्व असणारे संजय प्रधान हे कोल्हापूर जिल्यातील एकमेव उदाहरण असावे.
स्वतःचे शरीर साथ देत नसतांनाही संजय कुटूंबासाठी संघर्ष करत होता...!
बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी संघर्ष करत होता...!
आंबेडकर घराणे मोठे होऊदे म्हणून त्यांच्या प्रेमाखातर वंचित बहुजन आघाडी साठी आघाडीवर राहून कार्य करत होता...!
प्रबोधनाच्या चळवळीला पाठबळ मिळावे म्हणून "साप्ताहिक भीमयान" ची पत्रकारिता, प्रचार आणि प्रसिद्धी साठी झटत होता....!
आरपीआय पक्ष मजबूत व्हावा म्हणून ही सहकार्य आणि पाठबळ देत होता.
त्याचबरोबर समता सैनिक दलाचा निष्ठावंत सैनिक होता.. !
अणि कुटुंबाची सेवा करत समाजसेवा करणारा सच्चा समाजसेवक होता.. !
जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे स्वप्न साकार व्हावे म्हणून ज्या व्यक्ती संस्था, पक्ष आणि संघटना कार्य करत आहेत त्या सर्वांच्या बरोबर बांधिलकीचे घट बंध संजयने निर्माण केलें होते,
त्यामुळे संजय प्रधान सर्वांचा लाडका होता...!
सर्वांना हवा हवासा वाटत व होता...!
सर्वांच्या गळ्यातील संजय म्हणूनच ताईत बनला होता....!
चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मृत्यूही चळवळीत कार्य करताना व्हाव्हा ...?
ही मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. अखेरच्या दिवशी ते "राजस्थान मधील इंद्रकुमार मेघवाल या बालकाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी होऊन दोषी व्यक्तीला शासन व्हावे" म्हणून तहसीलदाराना निवेदन देण्यासाठी ते कागल येथे गेले होते, मात्र तेथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने निपाणी येथे ऍडमिट केले, तेथून कोल्हापूर ला हलवले मात्र समाजासाठी संघर्ष करणाऱ्या संजयला आपल्या शरीरा बरोबर संघर्ष करताना अपयश यावे ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल...!
जिल्ह्यातील सर्वचजण त्यांना लवकर बरे वाटावे म्हणुन प्रार्थना करत होते, आर्थिक आधार देत होते, मात्र शेवटी चळवळतील या दीपस्तंभाला शरीराने साथ नाही दिली, त्यामुळे संजयला अर्ध्यावर डाव मोडावा लागला आहे हे मोठे क्लेशकारक आणि दुःखदायक आहे ...!
त्यांचे अधुरे कार्य पुढे सुरू रहावे...!
चळवळीसाठी समाजातून अनेक संजय निर्माण व्हावेत...!
एवढीच माफक अपेक्षा...!
संजय प्रधानला भावपूर्ण श्रद्धांजली..!
-- अशोक कांबळे सर, हसुर बुद्रुक.
उपसंपादक, साप्ताहिक भीमयान
1 Comments
भावपूर्ण आदरांजली💐💐💐
ReplyDelete