भारतीय बौध्द महासभा, हातकणंगले तालुक्याच्या वतीने बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

विशेष अतिथी म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमरावजी आंबेडकर साहेब उपस्थित राहणार 

हातकणंगले दि. 24 : भारतीय बौध्द महासभा, हातकणंगले तालुक्याच्या वतीने शनिवार दि. 26 मार्च 2022 इ. रोजी ईरा हॉल, हायवे वाठार रोड, पेठ वडगांव येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत भव्य अशा बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेला विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमरावजी आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत.

सदरची परिषद तीन सत्रामध्ये होत असून त्यामध्ये अनुक्रमे उद्घाटकीय सत्र, प्रबोधन सत्र व जाहीर सभा तसेच निळ्या पाखरांची माय हा भिमगीतांचा ऑर्केस्ट्रा असा दिवसभरात भरगच्च कार्यक्रम आयोजन केला आहे. 

या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे, राज्य सरचिटणीस सुशिल वाघमारे, सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगांवकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस.पी. दिक्षीत, सरचिटणीस अरविंद कांबळे, कोषाध्यक्ष गोविंद कांबळे, मा. एस. आर. कांबळे असि. स्टाफ ऑफीसर, मा. एस.एस. कांबळे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक, सौ. रेखाताई बनगे जिल्हा उपाध्यक्षा, सौ. मनिषाताई कुरणे जिल्हा सचिव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदरची भव्य परिषद भन्ते धम्मप्रियजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून परिषदेचे अध्यक्षस्थान मा. राजेंद्र भोसले हातकणंगले तालुकाध्यक्ष हे भूषविणार आहेत.

या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन तालुका सरचिटणीस प्रभाकर कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.