विश्व धम्मलिपि  गौरव दिवस 

दान पारमिता फाऊंडेशन या संस्थेमार्फत  साजरा

नागपूर/प्रतिनिधी : 

धम्मलिपी  चे  जनक  सर  जेम्स  प्रिन्सेप यांच्या  जयंतीदिनी  २० ऑगस्ट रोजी  त्यांना  अभिवादन  करण्यासाठी  आणि  त्यांच्या  कार्याचा  गौरव  म्हणून विश्व  धम्मलिपी  गौरव  दिन साजरा  केला  जातो. ज्या  ठिकाणी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध  धम्माची दीक्षा घेतली  त्या नाग भुमीत नागपुर शहरात  प्रथमच विश्व धम्मलिपि गौरव  दिवस दान पारमिता फाऊंडेशन या संस्थे मार्फत साजरा करण्यात आला. हा  दिवस  आपल्याला आपली  संस्कृती,  आपली ओळख, आपली  धम्मलिपि , आपली  पाली  भाषा यांचा परिचय  करून  देतो.  या  कार्यक्रमात  मोठ्या  संख्येने बांधव सह परिवार  सहभागी  झाले होते. आणि  एका  ऐतिहासिक  सुवर्ण  क्षणाचे साक्षीदार  झाले.

कार्यक्रमाच्या  सुरुवातीला  प्रमुख   अतिथींच्या  हस्ते भगवान गौतम बुद्ध, महान चक्रवर्ती सम्राट  अशोक, सर जेम्स प्रिन्सेप, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या महापुरुषांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात  आला. त्या नंतर आयु. डॉ. मधुकर कठाने  सर, दयानंद मिसाळकर सर , अलका गवई मॅडम , निरझरा मॅडम , सुनिल खरे सर , प्रविण जाधव सर , संतोष आंभोरे सर , यांच्या हस्ते  दिपप्रज्वलन करण्यात आले.  विजया उमाळे, ज्योती खैरमोडे, मयुरी दामोदर यांनी सुंदर आवाजात स्वागत गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख वक्ते आयु. डॉ. मधुकर कठाने यांचा सर जेम्स प्रिंसेप धम्मलिपी स्टार युवा प्रचारक शाल आणि गुलाबपुष्प देऊन आयु. प्रविण जाधव सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयु. दयानंद  मिसाळकर  यांना सर जेम्स प्रिंसेप धम्मलिपी स्टार युवा प्रचारक पुरस्कार शाल आणि गुलाबपुष्प देऊन आयु. संतोष आंभोरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयु. आकाश हजारे यांचा सर जेम्स प्रिंसेप धम्मलिपी स्टार युवा प्रचारक म्हणून ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. नंतर प्रमुख वक्ते आयु. मधुकर कठाने सर यांचे  विदर्भातील बौध्द धम्माचा पुरातत्वीय इतिहास या विषयावर अतिशय सुंदर असे व्याख्यान झाले.

आपले विचार व्यक्त करतांना सर म्हणाले, सर जेम्स प्रिसेंप भारतात आले नसते तर तथागत बुध्द आणि सम्राट अशोक यांचा दैदीप्यमान ईतिहास समजून घेण्यापासून भारतीय वंचित राहिले असते. शिलालेखात काय लिहिले आहे हे समजण्याची प्रचंड जिज्ञासा अवघ्या 20 वर्षाचे आयुष्य असंताना स्काॅलर जेम्स प्रिसेंप यांच्या मनात निर्माण होते आणि हा अवलिया आपले आयुष्य या धम्मलीपीच्या शोधासाठी वाहून घेतो. आपल्या भाषणात सरांनी विदर्भातील लेण्यांबद्दलची बहुमूल्य माहिती श्रोत्यांना सांगितली.

दुसऱ्या सत्राची सुरूवात आयु. दयानंद मिसाळकर सर यांचे  बुद्ध लेणी समजुन घेतांना या  विषयावर  अत्यंत अभ्यासपूर्ण असे व्याख्यान दिले. मिसाळकर सरांनी खुप  चांगल्या प्रकारे जातककथा  समजावुन सांगितल्या. तसेच लेणी मध्ये कोरलेले घोडा, बैल, हत्ती, सिंह, विविध प्राणी पक्षी यांचे लेणी मधील शिल्प का कोरण्यात आली आहेत, प्रत्येक शिल्पाचा काय अर्थ होतो अशी अभ्यासपूर्ण माहिती दिली.  जातककथा  समजावुन सांगितली. तसेच लेणी मध्ये कोरलेले घोडा , बैल , हत्ती , सिंह , या प्राण्यांविषयी माहिती दिली.. सर आपल्या भाषणात म्हणतात, 

शिलालेखात लिहिलेले 'देवानाम् प्रिय प्रियदस्सी' याचा शब्दांचा उलगडा लोकांना होत नव्हता त्या काळात विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या या युवकाने धम्मलिपीचा शोध 1837 मध्ये लावला. अवघे 40 वर्षे आयुष्य जगलेल्या जेम्स प्रिसेंप यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात, "गेली सतरा वर्षे मी वैभवशाली भारताची तीर्थयात्रा करित आहे. मला पुन्हा पुन्हा आभार मानले पाहिजे. मला खूप आशिर्वाद मिळाले आहे आणि यात मला जे समाधान मिळाले आहे ज्याशिवाय मानसाला खरेखुरे सुख प्राप्त होत नाही." त्या नंतर धम्म लिपीच्या विद्यार्थ्यांनी  धम्मलिपि मध्ये बनविलेल्या  असाईनमेंट सर्वांना दाखविण्यात आल्या. आणि  त्या असाईनमेंट मधुन उत्कृष्ट अशा तीन असाईनमेंट ला पुरस्कृत करण्यात आले .

त्यापैकी, प्रथम पुरस्कार - आयु.अशोक डुले द्वितीय  पुरस्कार  -श्रीयांश नंदागवळी तृतीय  पुरस्कार - शिला शंभरकर यांना ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.  सूत्रसंचालन रुपाली गायकवाड व निर्झरा रामटेके ह्यानी केले, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  अलका गवई  ,  निर्झरा रामटेके  यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, त्यांचे देखील विशेष आभार आणि कौतुक  उपस्थितांमार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमास मोठया संख्येने बंधु आणि भगिनी संपूर्ण महाराष्ट्र भरातून उपस्थित होते. दान  पारमिता   फाऊंडेशन भारत  सरकार  नोंदणीकृत  संस्थेच्या वतीने इथून पुढे ही भारताच्या लौकीक इतिहासाला कायम उजाळा देण्यासाठी दान पारमिता फाऊंडेशन नेहमी कटिबद्ध असेल अशी ग्वाही संतोष आंभोरे यांनी संचालक मंडळामार्फत दिली.