ऑल इंडिया पँथर सेनेचे राज्यभर निदर्शने
ऑल इंडिया पँथर सेनेचे राज्यभर निदर्शने
अकोला/प्रतिनिधी :
राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, बौध्दांवर वाढत जातीय अन्याय अत्याचार, ॲट्रॉसिटी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधी, पदोन्नती आरक्षण, विद्यार्थ्यांच्या समस्या व अन्य इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेने राज्यामधील प्रत्येक तालुक्यातील तालुकाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली. अकोला येथे जिल्हा अध्यक्ष अकुंश तायडे, आशिष सोनोने, संदीप दामोदर, संकेत भाई जगताप, शुभम तायडे आदीं उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे विविध ठिकाणी डरकाळी आंदोलन.
चाकूर येथे डरकाळी आंदोलनाचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. या निवेदनात राज्यातील अनुसूचित जाती - जमात, बौध्दांवरील वाढते जातीय अन्याय - अत्याचार, (Atrocity), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा भोंगळ कारभार, पदोन्नती आरक्षण, विद्यार्थ्यांच्या समस्या व अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद वाघमारे, शहराध्यक्ष विश्वजित महालिंगे आदिंची उपस्थिती होती.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे डरकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आँल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शहराध्यक्ष विकास बनसोडे, युवा शहराध्यक्ष योगेश सुर्यवंशी, शहर सचिव आशिष श्रृंगारे, शहर कोषाध्यक्ष विजय बोणे, कोषाध्यक्ष रितेश वाघमारे, शहर संघटक परमेश्वर ताकपीरे, शहर सरचिटणीस अमर कांबळे, युवा शहर कार्याध्यक्ष अतुल सोनवणे, सिध्दार्थ मस्के, किरण सुर्यवंशी, बालाजी बनसोडे, गुरुदत्त आदमाने, कामेश आदमाने, निलेश सोनवणे, बालाजी ढगे, वायु आदमाने, संदेशकुमार सुर्यवंशी, चंद्रकांत गायकवाड, रावसाहेब गायकवाड, मिलिंद कांबळे, अभय कांबळे, कृष्णा सुर्यवंशी, दशरथ कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देवणी तहसील कार्यालय येथे डरकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आँल इंडिया पँथर सेनेचे ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, कोषाध्यक्ष श्रीमंत शिंदखेडे, रामदास काबळे, गुलाब कांबळे, बळीराम कांबळे,लक्ष्मण कांबळे, अरविंद सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निलंगा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने डरकाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आठ विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी नेतृत्व लातूर ग्रामीण जि. अध्यक्ष मेघराज जेवळीकर, जिल्हा निरिक्षक आकाश कांबळे, चापोली शहराध्यक्ष गोपाळ सरकाळे, शहराध्यक्ष विकास कांबळे, ता. उपाध्यक्ष सचिन गायकवाड, शहर उपाध्यक्ष चेतन गायकवाड, अमित लोकरे, सुमित लोकरे, सागर नाटकर, अवधूत सूर्यवंशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





0 Comments