मागासवर्गीय सदस्य शिवीगाळ प्रकरणी चिपरी ग्रामपंचायत सदस्यावर निलंबनाची कारवाई व ऎट्रॊसिटी दाखल करा
मागासवर्गीय सदस्य शिवीगाळ प्रकरणी
चिपरी ग्रामपंचायत सदस्यावर
निलंबनाची कारवाई व ऎट्रॊसिटी दाखल करा :
कोल्हापूर जिल्हा बौध्द जनजागृती समिती व भारतीय बौध्द महासभेची मागणी
जयसिंगपूर/प्रतिनिधी :
चिपरी येथे दि.31 ऒगस्ट 2021 रोजी मासिक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मिटिंगमध्ये ठरावांचे वाचन सुरू असताना मागील मिटिंगमध्ये झालेले विषय वाचण्यास यावेत यासाठी ग्रा.पं.सदस्य प्रितम पाटील याने मागणी केली. यावेळी सर्व सदस्यांना मागील विषय माहिती असल्यामुळे वेळ न घालविता, सविस्तर चर्चा न करता पुढील विषय वाचन्यात यावेत असे ग्रा.पं.सदस्य विश्वजित कांबळे यांनी सुचविले असता प्रितम पाटील याच्याकडून ग्रा.पं.सदस्य विश्वजित कांबळे यांना शिवीगाळ केली. तसेच अंगावर मारण्यास धावून आले. यावेळी सभागृहामध्ये ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच यांच्यासह 16 सदस्य उपस्थित होते.
घडलेला गंभीर प्रकार लक्षात घेऊन ग्रामसभा अध्यक्षांनी आदेशाद्वारे ग्रा.पं.सदस्य प्रितम पाटील याला माफी मागून सभागृहातून हकालपट्टी केली. मा.विश्वजित कांबळे हे चिपरी ग्रामपंचायतीचे सदस्य असून कोल्हापूर जिल्ह्यातील बौध्द समाजाचे प्रतिष्ठित समाजसेवक आहेत. ते आमचे श्रध्दास्थान असून आमच्या मागासवर्गीय सदस्यास कोणी शिवीगाळ करीत असेल तर आम्ही शांत राहणार नाही. ग्रामसेवकांनी तसेच प्रशासनाने यावर कोणती दखल घेतली? का सतत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय सदस्य, मागासवर्गीय समाजाने मान खाली घालून जगत रहायचे का? फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये असे कृत्य वारंवार घडत आहे. एस.सी., एस.टी, समाजावर अत्याचार, अन्याय वारंवार घडत आहेत. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यानुसार मागासवर्गीय सदस्य विश्वजित कांबळे निवडून आले आहे. ते खुल्या जागेवरून तसेच चिपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये अपक्ष निवडून येणारे ते पहिले उमेदवार आहेत. ते बौध्द समाजाच्या आदरस्थानी आहेत. अशा व्यक्तीला कोणी शिवीगाळ करीत असेल तर बौध्द समाज शांत राहणार नाही. प्रशासनाने यावर प्रितम राजेंद्र पाटील याचे निलंबन करून त्याच्यावर ऎट्रॊसिटी दाखल करावी अन्यथा 7 दिवसात बौध्द समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.
सदर निवेदनाचे पत्र गटविकासअधिकारी यांना तसेच जयसिंगपूर पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. यावेळी भिमराव तांबे, अमित वाघवेकर, विश्वास शिंगे, संभाजी कोठावळे, प्रफुल्ल कांबळे, रामदास भंडारे, प्रभाकर कांबळे, उमेश कामत, अमोल तगारे, संदीप कांबळे, बुध्दभूषण कांबळे, दिगंबर कोठावळे, अनिल कांबळे, केतन कांबळे, दिपक कांबळे, विकास कांबळे, प्रविण शिंदे, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष भुयेकर, सचिव शितल कांबळे, बबन कांबळे, हेरोद आवळे, अमित कांबळे तसेच वनिता कांबळे, अमृता कांबळे, उषा कांबळे, शुभांगी कांबळे, धोंडू कांबळे, साखरू दगेकर, आशा पाटील, मंगल दुधाळकर यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









0 Comments