" वंचित बहूजन " आपल्या दारी

कागल तालुका वंचित बहूजन आघाडीचा उपक्रम

---------------

कागल/ प्रतिनिधी

     वंचित बहुजन आघाडीचे  राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार कागल तालुक्यातील घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्यात सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील 14 गावांना भेटी देऊन अभियान ची सुरवात करण्यात आली.

       संघटना बांधणी बरोबरच वंचित घटकांना सत्ता संपादन करण्याची संधी उपलब्ध करून देणे, शासकीय कामांची पूर्तता करणे, व कोरोना मूळे मृत्यू   झालेल्या कुटुंबाचे सांत्वन करणे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  दौऱ्यामध्ये सहभागी असलेल्या मध्ये कागल तालुका वंचित बहुजन चे अध्यक्ष आनंदा कांबळे गोरंबे कर,कापशी जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष साताप्पा कांबळे वडगावकर, महिला अध्यक्ष वंदना ताई कांबळे, रविंद्र कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), प्रमोद विभुते (तालुका उपाध्यक्ष,) ज्येष्ठ नेते अमोल कांबळे (सांगाव )कृष्णा कांबळे (कासारी)संजय प्रधान, विकास कांबळे, नीलम प्रधान, (जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी) अशोक कांबळे जेष्ठ नेते सुळकुड , गौतम गंभीर (उपाध्यक्ष कापसी जिल्हा प. मतदारसंघ) महेश कांबळे( सचिव कापशी जिल्हा परिषद मतदारसंघ )अभिजीत कांबळे, (सहसचिव कापसे जिल्हा परिषद मतदारसंघ), धनाजी सेनापतीकर, शंकर कांबळे, अभिजीत कांबळे मोहन कांबळे, प्रवीण कांबळे, शुभम कांबळे, कल्याणी राजवर्धन (हसुर खुर्द )- उपाध्यक्ष महिला आघाडी. व इतर कार्यकारिणीतील सर्व सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.