भारतीय बौद्ध महासभेतर्फे  चिकोत्रा खोर्‍यात सदभावना भेट

कागल/प्रतिनिधी-

कोल्हापूर जिल्हा भारतीय बौद्ध महासभे तर्फे चिकोत्रा खोर्‍यातील काही गावात सदभावना भेट देण्यात आली. कार्यकारिणीची कोरोना महामारीची परिस्थिती आणि रतन सुत्त महती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर बाल, महिला संस्कार शिबिर, यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल यामध्ये कागल तालुक्यातील तरुण व तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली.

कोरोना महामारीतील सद्भावना भेटीसाठी जिल्हाध्यक्ष एस.पी. दीक्षित, जिल्हा सचिव अरविंद कांबळे, संस्कार जिल्हाध्यक्ष विद्याधर देशमुख, कागल तालुकाध्यक्ष तानाजी भोसले, साप्ताहिक भीमयानचे उपसंपादक अशोक कांबळे, आनंदा गोरंबेकर, धनाजी सेनापतीकर, साताप्पा कांबळे वडगावकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा कागल तालुका अध्यक्ष तानाजी भोसले यांनी केलेे होते. भारतीय बौद्ध महासभा चिकोत्रा खोरे परिसर समाज बांधव व धम्म उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित राहिले. यावेळी तालुक्यातील पंधरा गावांना भेटी देऊन प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजश्री साताप्पा कांबळे वडगावकर, प्रा. गजानन कांबळे -चिखली, संजय प्रधान -मुरगूड, विलास सरनाईक -करड्याळ, आनंद कांबळे -नंदयाळ, कल्याणी राजवर्धन -हसुर खुर्द, गौतम कांबळे -से.कापशी कासारी, धनाजी सेनापतीकर -कापशी सेनापती, बबन कांबळे -मांगनूर ,बाळासो कांबळे  -मांगनूर, सेनापती कापशी जिप मतदार संघ अध्यक्ष साताप्पा कांबळे -वडगाव, गौतम भैरु कांबळे-कासारी, प्रवीण कांबळे -कासारी, तात्यासो कांबळे -जैन्याळ, अरविंद कांबळे -कासारी, अभिजीत कांबळे -कासारी तसेच बेलेवाडी काळम्मा येथील डी.बी.कांबळे, बाबासाहेब कांबळे, बाळासो कांबळे, मिलिंद महेकर, भिकाजी कांबळे, अनिकेत कांबळे, विनायक कांबळे आदींचे सहकार्य लाभले.


अतिक्रमण त्वरीत काढावे अन्यथा तीव्र आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते संतोष कोठावळे यांचा इशारा

मजले/प्रतिनिधी-

मजले येथील सरपंच सिकंदर कोठावळे व त्यांचे कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष कोठावळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

 सरपंच सिकंदर कोठावळे यांनी पदाचा दुरूपयोग करून स्वत: व कुटुंबियांनी शासकीय जमीन गट नं.1 यावर अतिक्रमण केले आहे. सदर जमिन पोलिस अधिक्षक, कोल्हापूरची असून ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते संतोष कोठावळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदरची तक्रार दिली आहे. लवकरात लवकर अतिक्रमण हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे संतोष कोठावळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.