बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्थेच्या 

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सतिश भारतवासी यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी :

बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्थेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सतिश भारतवासी यांची निवड करण्यात आली. सदर निवड संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पवार, राष्ट्रीय सचिव किसन थुल यांनी निवडीचे पत्र दिले. 

सतिश भारतवासी हे साप्ताहिक भीमयानचे स्टार लेखक असून प्रख्यात लेखक, कवी तसेच चळवळीचे गाडे अभ्यासक आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकीची भावना व चळवळीची तळमळ पाहून जिल्हाध्यक्ष जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सतिश भारतवासीचे योगदान पाहता त्यांना ह्या पदाची धुरा दिल्याचे पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे. भविष्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग चळवळीकरिता करून बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार लागणार आहे. पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.