पँथर सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

अकोला/प्रतिनिधी :

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 2019-20 चे द्वितीय भत्ता हा थकीत असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच हालाखीची आहे.  तरी तात्काळ योजनेचा लाभ विद्यार्थ्यांचा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पँथर सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. 

पँथर सेनेचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना स्वाधार योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा भत्ता देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.  संकेत जगताप, प्रशिक वाहूरवाघ, सूरज इंगोले, प्रजवल शिरसाट, प्रथमेश वाहूरवाघ, आदित्य घोडे, रोहित अवचार व सचिन खंदारे हे उपस्थित होते.