नवनिर्वाचित महापौरांचा लहुजी साळवे जनजागरण मंडळाच्या वतीने सत्कार
नवनिर्वाचित महापौरांचा लहुजी साळवे जनजागरण मंडळाच्या वतीने सत्कार
अहमदनगर/प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात एक आगळा वेगळा राजकीय इतिहास असणाऱ्या अहमदनगर शहराची ओळख आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदी रोहिणीताई शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा आद्य क्रांतिकारी लहुजी साळवे जनजागरण मंडळाच्या वतीने वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आकाश लोखंडे , उपाध्यक्ष आकाश साबळे , हर्षद शिर्के , सनी उमाप , आकाश जाधव , अजय शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार मांडताना आकाश लोखंडे म्हणाले की , महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौरपदी मातंग समाजाच्या रोहिणी ताई शेंडगे यांची बिनविरोध निवड म्हणजे सुवर्णकाळ असून ही खुप गौरवाची व आनंदाची बाब आहे . त्यांच्या कार्यकाळात समाजाचे विविध सामाजिक विषय व प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. पुढे आकाश साबळे यांनी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस व कार्यास शुभेच्छा दिल्या .


0 Comments