सामाजिक न्याय संशोधन प्रकल्प आणि प्रकाशनासाठी रुपये पाच लाख पर्यंत आर्थिक सहाय्य संशोधन शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करा!!

नवी मुंबई : 

1) पीपल्स एम्पॉवरमेंट सोसायटी, नवी मुंबईच्या वतीने संशोधकांसाठी आर्थिक सहाय्य संशोधन शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.

२) भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती लढ्याच्या पर्वाची शंभरी पूर्ण झाली आहे (१९२० ते २०२०) या दोन्ही घटना सामाजिक न्यायाच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या संयुक्त करारातून संविधानातील आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर न्यायासाठी च्या तरतुदी अनुसूचित जाती जमाती आणि अन्य सामाजिक आणि लैंगिक दृष्ट्या गुलामीत जीवन जगलेल्या नागरिकास सबल होण्यासाठी निश्चित झाल्या आहेत.

३) संविधानिक तरतुदींच्या अधीन राहून अनेक लोक कल्याणकारी कायदे आणि अनुसूचित जाती जमाती साठी सामाजिक न्यायाच्या योजना सरकारने राबविल्या आहेत. 

४)सरकारने सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती जमाती साठी योजनांचा व कायद्याचा आढावा, फेरआढावा, तपासणी, फेरतपासणी, पुनर्तपासणी, हिशोब तपासणी चिकित्सा, त्रयस्थ संस्था आणि  संविधानिक नीतिमत्ता धारण करणाऱ्या संशोधकांकडून होणे अपेक्षित आहे.

५) म्हणून पीपल्स एम्पॉवरमेंट सोसायटी, नवी मुंबई द्वारे वर उल्लेखित विषयात केलेल्या संशोधन प्रकल्पाचे प्रकाशन अथवा नव्याने संदर्भीय विषयांवर संशोधन करणाऱ्या संशोधकाला कमाल पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य संशोधन शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.

६) सामाजिक न्याय संशोधन शिष्यवृत्तीची मागणी करणाऱ्या संशोधकांना संशोधक प्रकल्पाचा संक्षिप्त अहवाल, संशोधनाचा अंदाजपत्रकीय खर्च व संशोधक मार्गदर्शक संस्था तथा  मार्गदर्शकाच्या शिफारसीसह अर्ज करणे आवश्यक आहे.

७)सदर संशोधन शिष्यवृत्ती ही संस्थेची स्वतंत्र योजना आहे ही योजना राबविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सरकारी अथवा अन्य संस्थांकडून अनुदान, मदत, देणगी पिपल्स एम्पॉवरमेंट सोसायटीने घेतलेली नाही.

८) पात्र व इच्छुक संशोधक उमेदवारांनी अटी व शर्तींची पूर्तता करून संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज, स्वतःचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, संशोधन प्रकल्पाचा विषय, संशोधन प्रकल्प पूर्ण झाला असल्यास संशोधन प्रकल्प अहवालाची संक्षिप्त प्रारूप निष्कर्ष पत्रिका, अथवा संशोधन नियोजन खर्चाच्या अहवालासह  peoplesempowermentsociety@gmail.com यावर 15 ऑगस्ट 2021 च्या पूर्वी अर्ज करावा.

९) संशोधन शिष्यवृत्ती साठी त्रयस्थ व्यक्ती व्यक्ती अथवा अन्य माध्यमांद्वारे सदर योजनेचा लाभ अवगत करण्यासाठी दबाव आणि बेकायदेशीर मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न झाल्यास सदर उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविला जाईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन संस्थेच्यावतीने हर्षल शाक्य संस्थापक सचिव तथा संचालक यांनी केले आहे.