समाजमंदिरासाठी लवकरच आंदोलन उभा करणार : नितिन कांबळे

जयसिंगपूर/प्रतिनिधी :

जयसिंगपुरातील गल्ली नं. 19 मधील समाजमंदिराची गळती व सुशोभीकरणासंदर्भात जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना निवेदन देऊनही अद्याप काम सुरू केले गेले नाही. आठवड्याभरात काम सुरू न केल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती बहुजन सेवा संघचे अध्यक्ष नितिन कांबळे यांनी दिली.

नितिन कांबळे म्हणाले, गल्ली नं.19 मधील समाजमंदिराची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. गेली दोन वर्षे समाजातील नागरिकांनी पदरचे पैसे घालून या समाजमंदिराची दुरूस्ती केली होती. जयंती लागणारा पैसा विनाकारण इतरस्त्र खर्च न करता समाजमंदिर सुशोभिकरण करण्यासाठी पैसे खर्च केले होते. मात्र नगरपालिकेकडून एकदाही दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. समाजमंदिराच्या परिसरातील पेव्हिंग ब्लॊक बसवावेत, स्लॅबचे गळतीचे काम पूर्ण करून द्यावे, रंगरंगोटी करून मिळावी यासाठी गेल्या आठवड्यात निवेदन देऊनही उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी मागासवर्गीय समाजाकडे लक्ष दिलेले नाही. लवकरात लवकर काम पूर्ण करून देतो असे आश्‍वासन देऊनही यड्रावकराकडून अजून कामाची पुर्तता झाली नसल्यामुळे लवकरच आंदोलन घेणार असल्याचे नितिन कांबळे यांनी सांगितले.