मोदीजींनी बेरोजगार तरुणांची माफी मागावी

देशाचे वार्षिक बजेट ३४ लाख करोड, तर रोजगार निर्मितीसाठी १०० लाख करोड कोठून येणार : अमोल वेटम

सांगली:

सन २०२१-२२ सालचे भारताचे वार्षिक बजेट हे ३४.८३ लाख करोड इतके आहे. ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषणात म्हंटले की ते बेरोजगार तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी १०० लाख करोड रुपये देणार , जेवढे बजेट भारतीय अर्थव्यस्थेचे एका वर्षामध्ये नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त असणारी ही रक्कम प्रधानमंत्री कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जगाच्या इतिहासात इतके आत्मविश्वासाने खोटे कोणीही बोलले नसेल, मोदींच्या या भाषणाचा सोशल मिडियातून संतप्त व्यक्त होत आहे, मोदीजीनी बेरोजगार तरुणांची, जनतेची माफी मागावी, असे रिपब्लिकन स्टुडंट युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम म्हणाले.

देशातील बेरोजगारी बाबत ४५ वर्षातील उच्चांक गाठलेला आहे, कोरोना कालावधीत लाखो तरुणांनी आपला रोजगार गमावलेला आहे. भारतचे सन २०१९-२० रोजीचे बजेट हे २७.८६ लाख करोड इतके होते तर सन २०२०-२१ चे बजेट २६.९९ लाख करोड इतके होते. गेल्या तीन वर्षातील भाषणात प्रधानमंत्री यांनी जाहीरपणे खोटे बोलल्याचे दिसून आले. मोदींनी आपल्या भाषणात सन २०१९ रोजी १०० लाख करोड आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जाहीर केले तर २०२० रोजी ११० लाख करोड इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रोजेक्ट साठी जाहीर केले तर १५ ऑगस्ट २०२१ रोजी १०० लाख करोड बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी जाहीर केले . एकंदरीत पाहता देशाचे गेल्या तीन वर्षाचे बजेट एकूण ९० लाख करोडच्या जवळपास इतके आहे. मोदी सरकारकडून झपाट्याने खासगीकरण होत आहे आणि यातच अशी जुमलेबाजी होत आहे,  संवेदनहीन मोदी सरकारचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत असे अमोल वेटम म्हणाले.