सांगलीतील फुले स्मारक बनले मद्यपानाचा अड्डा, तर आंबेडकर स्टेडियम बनले पार्किंगचा अड्डा
सांगलीतील फुले स्मारक बनले मद्यपानाचा अड्डा, तर आंबेडकर स्टेडियम बनले पार्किंगचा अड्डा
किती दिवस या महापुरुषांचां अपमान होत राहणार, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
सांगली/प्रतिनिधी दि. 20 : सांगली मिरज रोडवरील क्रांतिबा जोतिबा फुले यांचे स्मारक तसेच सांगली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम याची प्रचंड दुरवस्था व विटंबना सुरू आहे. फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था असून याठिकाणी आसपास परिसरातील सांडपाणी, केर कचरा, मातीचे ढिगारे, दारूच्या बाटल्या, हॉस्पिटलचा कचरा येथे टाकले जात आहे तसेच हे स्मारक मद्यापानाचा अड्डा बनलेला आहे. केवळ जयंती दिवशी नाममात्र डागडुजी केली जाते वर्षभर पुन्हा या स्मारक तसेच उद्यानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
सांगली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची प्रचंड दुरावस्था आहे, पाव्हेलियान दुरुवस्था, समपातळी नसणे, आजूबाजूच्या परिसरातील सांड पाणी सोडणे, लाईट नसणे, रात्री दारू व मद्यपान यांचा अड्डा बनलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवास्थानी जवळ असणार्या या स्टेडियमची अनेक वर्षापासून विटंबना सुरू आहे. स्टेडियम समोरील गेट जवळ नो पार्किंगचा बोर्ड असून देखील आजूबाजूच्या परिसरात असणार्या दुकानात येणार्या नागरिकांकडून बेकायदेशीर दुचाकी व चारचाकी पार्किंग करण्यात येत आहे, याकडे ट्रॅफिक पोलिसांचे व मनपाचे दुर्लक्ष आहे, स्टेडियमच्या विकासाबाबतचा 18 कोटींचा प्रस्ताव मंत्रालयात सन 2017 पासून धूळ खात पडून आहे यावर जाणीवपूर्वक कार्यवाही होत नाही.
जोतिबा व सावत्रिमाई फुलें यांनी शेन गोळा दगडाचा मारा झेलत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली आज जातीवादी मनपा प्रशासन व लोक प्रतिनिधी कडून फुले स्मरकाची आजही विटंबना सुरू आहे. तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बाबत मनपाच्या अर्थसंकल्प मध्ये शून्य रुपयांची तरतूद करून आपला जातीवादी चेहरा उघड केलेला आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, मनपा प्रशासन, महापौर, आयुक्त, लोकप्रतनिधीं, पालकमंत्री यांचा जाहीर निषेध रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी केला आहे.
0 Comments