आगळगाव अँट्रॉसिटी पिडीतांचे तात्काळ पुनर्वसन करा: अमोल वेटम
आगळगाव अँट्रॉसिटी पिडीतांचे तात्काळ
पुनर्वसन करा: अमोल वेटम
सहायक आयुक्तांकडे मागणी, उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या धाडसी कारवाईचे स्वागत
सांगली/प्रतिनिधी :
जिल्हा सांगली ,तालुका कवठे महांकाळ मु.पो.आगळगावत बौद्ध कुटुंबीयांचे राहते घर जातीवादी लोकांनी जेसीबी ने पाडले, अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ होत होती. दि. ३० पासून पिडीत कुटुंबातील नामदेव कांबळे, वर्षा कांबळे, विठ्ठल कांबळे, मंगल कांबळे हे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत छावणी आंदोलनास बसले होते. याबाबत दि ३० रोजी पिडीत कुटुंबांनी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे स्वप्नील खांडेकर यांच्या सोबत उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून आरोपींवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाईची मागणी केले, याची दखल घेत तत्काळ उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांना कारवाई करणेबाबत कळविले. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने यावर कारवाई करत कवठे महांकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यास सांगितले. त्यानुसार अखेर दि.३१ रोजी आरोपी विजय माळी, शोभा माळी यांच्यासह ४ ते ५ अनोळखी लोकांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी देखील पीडित व्यक्तीची भेट घेतली . याबाबत प्रशासनाच्या धाडसी कारवाईचे स्वागत होत आहे.
पीडित कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करा, त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, पोलीस संरक्षण द्या, भविष्यात त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल होण्याची संभावना आहे याकरिता पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी, आरोपीला जामीन मिळू नये याकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे स्वप्नील खांडेकर यांनी सहा आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे केली आहे.
0 Comments