अखेर विजयनगर रेल्वे ब्रीज व त्याखालील रस्ताबाबत काम सुरू : अमोल वेटम


रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या दणक्याने मनपा व रेल्वे प्रशासन जागे झाले


सांगली दि. ०६ : येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील विजयनगर रेल्वे ब्रीज व त्याखालील रस्ता हा मृत्युचा सापळा बनलेला आहे. याभागातील नगरसेवकांनी याकडे कानाडोळा केलेला होता. याबाबत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी आवाज उठवला होता, याचा पंचनामा केला व विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली, यावर मनपा व रेल्वे प्रशासन जागे झाले. सदर ब्रीज खालील रस्त्याचे काम सुरू झाले आहे याबाबत सध्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती अमोल वेटम यांनी दिली. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे वेटम म्हणाले. नगरसेवकांनी याचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. नागरिकांकडून रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे आभार व्यक्त केले जात आहे. 

तसेच या वॉर्डातील अन्य परिसर मंगलमूर्ती कॉलनीत गटारी तुंबून पाणी साठणे, हसुरे नगर, वानलेसवाडी, अकुजनगर, विद्यानगर, विलिंग्डन कॉलेज परिसर, विजयनगर, जैन गल्ली, अजंठा कॉलनी, शरदनगर, पाटील मळा, अहील्यानगर, सैनिक नगर, विनायक नगर, गंगा नगर गुरुकृपा कॉलनी विकास कॉलनी आदी भागातील नागरिकांच्या रस्ता, वीज बाबत , समस्या आहेत. 


या वॉर्डातील नगरसेवकांच्या आतापर्यंत केलेल्या कामाचे ऑडिट व्हावे, तो पर्यंत त्यांना मानधन देण्यात येऊ नये. अशी मागणी अमोल वेटम यांनी विभागीय आयुक्त यांना केली आहे.