आगळगाव येथील अत्याचारित कुटुंबाचे आरोपींवर अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल व्हावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत छावणी आंदोलन सुरू

सांगली/प्रतिनिधी दि. ३० : जिल्हा सांगली, तालुका कवठेमहांकाळ मु.पो.आगळगावत येथील बौद्ध महिला कुटुंबीयांचे जातीवादी लोकांकडून जेसीबी ने घर पाडले. नुकतेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा झाला, आजही अनुसुचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार थांबलेले नाही.  स्वंतंत्र दिनी पीडित कुटुंबियांनी या पाडलेल्या जागेवर आंदोलन सुरू केले. अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ करत आहेत. पिडीताने जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करूनही काहीही कारवाई नाही, आरोपी मोकाट आहेत. या अन्यायग्रस्त कुटुंबाने न डगमगता घडलेल्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, समाजीक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख यांचेकडे पुन्हा तक्रार अर्ज पाठवला आहे पण यावर ही काहीही कारवाई झालेली नाही.

या पीडित महिला कुटुंबीयांचे  राहते घर जेसीबी ने जमिनोदस्त करून बेघर सहकुटुंब आंदोलनास बसले. आरोपीवर अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित महिलेकडून करण्यात आली तरीही अजून गुन्हा दाखल केलेला नाही. कवठे महांकाळ पोलिसांकडून आवाज दाबला जात आहे.  त्यांच्या तक्रार अर्जातील आशय असा की आगळगाव हद्दीतील हाराळे वस्ती येथे नामदेव कबीरा कांबळे यांचे मालकीचे घर जबरदस्तीने विजय तुकाराम माळी याने काही लोकांना हाताशी धरून जेसीबी च्या साहाय्याने जमिनोदस्त करून या कुटुंबियांना बेघर केले आहे, आरोपी विजय माळी हा या परिसरातील मोठा बार व हॉटेल चालक आहे, घर पाडल्यामुळे कांबळे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत सदर घटनेची तक्रार दिली पण तरीही पोलिसानी या घटनेकडे गांभिर्याने पाहिले नाही त्यानंतर या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे न्यायाच्या अपेक्षेने तक्रार अर्ज दिला, पण यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 



जागेचा रितसर उतारा, घरपट्टी भरलेली पावती दाखवूनही कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे कागदपत्रे चुकीची आहेत म्हणून  या पीडित महिलेचा आवाज दाबला. स्वांतंत्र होऊन ७५ वर्ष झाले तरी अनुसूचित जाती, आदिवासी, बौद्धांवर अन्याय अत्याचाराचे सत्र सुरूच आहे.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जातीय अत्याचारबाबत ते मौन बाळगून आहेत. सांगली जिल्ह्यात जवळपास आजरोजी ४०० हून अँट्रॉसिटीचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत. नुकतेच जयंत पाटील यांचा कवठे महांकाळ दौरा झाला असताना देखील त्यांनी अत्याचारित ठिकाणी भेट दिली नाही याचा आम्ही निषेध करतो.

आरोपीं विजय माळी यांच्यावर अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल व्हावे , पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, पीडितांना संरक्षण द्यावे, कर्त्यव्यात कसूर कामी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यावर कारवाई व्हावी. आदी मागण्यासाठी पीडित व्यक्तीने सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत छावणी आंदोलन सुरू केले आहे.  या आंदोलनास ऑल इंडिया पँथर सेना , रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन, बळीराजा पार्टी, आझाद समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, डी पी आय आदींनी सहभाग नोंदविला. 

पीडित कुटुंबातील नामदेव कांबळे, मंगल कांबळे, विठ्ठल कांबळे, वर्षा कांबळे यांच्या सह रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनाचे स्वप्नील खांडेकर, तानाजी जाधव, बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते, मनोहर रास्ते, आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष संतोष आठवले, मिरज शहर प्रमुख अजित सगरे, समीर विजापूर, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे मुकेश सरोदे आदी उपस्थित होते.


बेमुदत छावणी आंदोलनाचा दुसरा दिवस

सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला जाहीर आवाहन

दि. ३1 : अगळगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथील बौद्ध कुटुंबीयांचे राहते घर जातीवादी लोकांनी उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपी यांच्यावर अद्यापही Atrocity कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून घेण्यास कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक यांची टाळाटाळ होत असल्याने पीडित कुटुंब हे सोमवार दि. ३० पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत छावणी आंदोलनास बसलेले आहेत. तरी या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आप आपल्या स्तरावर प्रयत्न करावे तसेच आंदोलनस्थळी समक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाला या अन्याय अत्याचाराच्या लढ्या विरोधात पाठबळ व धीर द्यावे. अशी विनंती आपणास करीत आहोत.

- अमोल वेटम, स्वप्नील खांडेकर, मुकेश सरोदे, तानाजी जाधव