सांगली येथील वॉर्ड क्रमांक ८ विजयनगर येथील धोकादायक रेल्वे ब्रिज व रस्ता बनला मृत्यूचा सापळा
सांगली येथील वॉर्ड क्रमांक ८ विजयनगर येथील धोकादायक रेल्वे ब्रिज व रस्ता बनला मृत्यूचा सापळा :
रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनची कार्यवाहीची मागणी
सांगली / प्रतिनिधी -
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचा वार्ड क्रमांक ८ मधील विजयनगर रेल्वे ब्रीज व त्याखालील असणारा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. रेल्वे ब्रीज हा धोकादायक बनलेला असून याची प्रचंड दुरवस्था आहे, याखलील असणाऱ्या रस्ता मध्ये सांडपाणी, कचरा येत आहे, या रस्ता मध्ये प्रचंड मोठे खड्डे पडून त्या डबक्यात सांडपाणी साठत आहे , लोखंडी सळ्या बाहेर आलेले आहेत. हाकेच्या अंतरावर नगरसेवक राहत असून देखील याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. नागरिकांना, महिलांना विद्यार्थ्यांना येता जाता तारेवरची कसरत करावी लागत आहे. चार नगरसेवक एका वॉर्ड मध्ये असून देखील एकही कामाचा नाही अशी जनभावना निर्माण झाली आहे. नागरिक संतप्त आहे. नगरसेवक, मनपाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे.
या रस्त्याचा वापर कुपवाड, अष्टविनायक नगर, श्रमिक नगर, विजयनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात, पोलिसांची गस्त, आपातकालीन सुविधा, शाळा, दवाखाना, शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, कोर्ट परिसर मधील नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत, अनेक जण जखमी झालेले आहेत, याला जबाबदार कोण अशा प्रश्न उपस्थित होत आहे, येत्या एक आठवड्यात ही दुरुस्ती झाली नाही तर रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या वतीने मनपा समोर भागातील नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल वेटम यांनी दिला.
0 Comments