स्कॉलरशिपकरिता भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निवेदन
स्कॉलरशिपकरिता भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निवेदन
आजरा/प्रतिनिधी :
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल स्कॉलरशिप(NMMS) संदर्भात व्यंकटराव हायस्कूलला भेट देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी प्राचार्य व क्लार्क यांच्याशी चर्चा झाली. येणाऱ्या काही दिवसातच शाळेच्या माध्यमातून पाठपुरावा करून शिष्यवृत्ती जमा करण्याची जबाबदारी घेण्यात आली. जर वेळेत मुलांची शिष्यवृत्ती मिळाली नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून शाळा व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यानंतर पंचायत समिती शिक्षण अधिकारी यांची ही भेट घेऊन प्रलंबित इतर शिष्यवृत्ती संदर्भात लवकरात लवकर पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा चेमा. गौतम मोरे (Bvm,bym आजार,गड, चंदगड प्रभारी), मा. हर्षवर्धन कांबळे (Bvm तालुका अध्यक्ष आजरा), मा. नितीन राऊत (Bin तालुका अध्यक्ष आजरा), मा.जयदीप कांबळे, मा. उबेद चांद, मा.चंद्रकांत शिंदे, मा. पृथ्वीराज कांबळे, मा.अझीम तकीलदार, मा. गौतम कांबळे, मा.गणेश कांबळे, मा.उमेश बुरुड, मा. हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते.



0 Comments