बाबा तुमच्या पोरांनी...
बाबा तुमच्या पोरांनी
तुमच्या विचारांचा गळा दाबलाय
तुमच्याच नावाच्या चौकात
तुमच्याच नावाच्या नगरात
आज त्यांनी गणपती बसवलाय
बाबा या पोरांनी गणपतीचा मंडप
विहाराकडेच तोंड करून लावलाय
यांना पाहून विहारातील बुद्धही हसलाय
बुद्धविहाराकडे जाणारा पाऊल यांनी
यांच्या गणपतीकडे वळवलाय
वंदना म्हणणार्यांना यांनी आरतीचा नाद लावलाय
तुम्ही दिलेल्या 22 प्रतिज्ञा तर सोडाच
यांना साधं त्रिसरण पंचशील नाहीय पाठ
गणपतीची आरती मात्र आहे तंतोतंत तोंडपाठ
स्वत: बरोबर समाजाचीही हे लावताहेत वाट
बाबा तुम्ही आणलेला धम्मरथ
यांनीच मधे रोखलाय
बाबा तुम्ही 22 प्रतिज्ञेत सांगितलय
मी गौरी गणपती मानणार नाही
मी ब्राह्मणाच्या हातुन कोणतेच
क्रियाकर्म करवून घेणार नाही
पण या लेकांनी बामणालाच आणून
इथे सत्यनारायण घातलाय
- धनाजी कांबळे


0 Comments