रविंद्र कांबळे यांची रिपब्लिकन युवा सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड.
रविंद्र कांबळे यांची रिपब्लिकन युवा सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड.
कागल /भीमयान प्रतिनिधी -
रिपब्लिकन पक्षाच्या युवा सेनेच्या पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत रविंद्र कांबळे यांची रिपब्लिकन युवा सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे हे होते.
रवींद्र कांबळे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनात आघाडीवर राहून कार्य केले, तसेच पुढील काळात ही रिपब्लिकन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यां पर्येंत पोहचण्यासाठी धडपड करतील असा बैठकीत विश्वास व्यक्त करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे अध्यक्ष शिंदे साहेब व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments