अजब आहे बुवा माणसाचं..!!


वर्षानुवर्षे आरुढ झालेली

गल्लिच्छ परंपरा आज याच

समाजव्यवस्थेच्या मानगुटीवर

ऐटीत बसून थैमान माजवतेय..!!


ज्ञान असुनही अज्ञानी 

असल्यागत आज याच

समाजाव्यवस्थेत माणूस नावाची

अज्ञानी जात आजही वावरतेय..!!


सांगुन ठेवलंय कुणी तरी

अन् चालत आलंय आजवरी

बेडकांचं लग्न अन् दगडाला

शेण थापनं कुठवर करायचं...!!


हेच दगडांचं थोतांड डोक्यावर घेऊन

स्वार्थापोटी भरल्या मोठ्या झाडांच्या

कत्तली करुन सिमेंटची जंगलं

कुठवर उभी करायचं...!!


पाऊस पडत नाही,

घाला दगडाला साकडे अन्

करा होमहवन...

आयुष्यात येऊन माणसाने कधी 

करायचं ना हो वृक्षारोपण...!!


मुलं होत नाहीत म्हणुन

माणसं करती दगडांचा जप तप अन् उपवास

बेकार आहे ज्ञानी माणसाचं

कोणी ऐकलंच नाही संत तुकारामांच...!!


ठेऊनी ज्ञान दगडांच्या पायथ्याला

माणूस करतो दगडाला दंडवत

अरे माणसा तुझ्याचपाशी

आहेत मायबापा सारखे भगवंत..!!




आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.

९६११२५३४४१.