नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे
दलित युथ पँथर जि. अध्यक्ष सुशिल सरकाळे यांनी निवेदनाद्वारे मागणी.
चाकुर :-
नवी मुंबई येथे होत असलेल्या नविन आंतरराष्ट्रीय विमानतळाला मा.दि.बा.पाटिल यांचेच नाव देण्यात यावे हि मागणी आम्ही मा. तहसीलदार मार्फत सदर निवेदना द्वारे सरकारला करीत आहोत. नवी मुंबई, पनवेल येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी मा.दि.बा.पाटिल खंबिरपणे उभे राहिले नसते तर त्या परिसरातील भूमिपुत्रांवर अन्यायच झाला असता. शेतकरी कामगार पक्ष व दि.बा.पाटिल यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये अग्रगण्य सहभाग राहिला आहे. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी साठी मा.दि.बा.पाटिल यांनी लढा उभारला होता. म्हणुन केवळ नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळी मध्ये काम करणारे, फुले, शाहु, आंबेडकरांना मानणारे आणि ह्या राज्यातील मोठ्या प्रमाणात ओ बी सी समाज आज नवी मुंबई येथे होत असलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटिल यांचे नाव द्यावे ही मागणी करत आहे. सदर मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करावा अन्यथा महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्याची गरज निर्माण होऊ शकते, म्हणुन सदर मागणीचा सकारात्मक विचार होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. असा इशारा दलित युथ पँथर जिल्हाध्यक्ष सुशिल सरकाळे यांनी दिला.
यावेळी आकाश कांबळे, दयानंद वाघमारे, रोहित कांबळे, ऋषीकेश कांबळे, आकाश सरकाळे आदिंची उपस्थिती होती.
1 Comments
खुप सुंदर माहिती मिळाली सर आपण चळवळीचं खर कार्य करीत आहात
ReplyDelete