पदोन्नती मधील आरक्षण मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न
पदोन्नती मधील आरक्षण मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न
कल्याण/ ठाणे :
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ , महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना यांची संयुक्तिक सभा संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह कल्याण येथे संपन्न झाली.
सदर सभेमध्ये सभेचे अध्यक्ष आणि रि.ए. फेडरेशनचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय थोरात, रि. ए. फेडरेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे
किरण काटे , महाराष्ट्र जि. प. शिक्षक संघटनाचे नीलकमल मेश्राम व सुनील संदानशिव , रि. ए. फेडरेशनचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत चव्हाण, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खैरनार, ठाणे जिल्हा कोषध्यक्ष श्याम सुंदर दोंदे, ठाणे जिल्हा सहसचिव आत्माराम बिराडे, ठाणे जिल्हा संघटक नवनाथ रणखांबे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वांगीकर, तालुका सहसचिव भूपेश पवार, तालुका संघटक शरद रातांबे व दादाराव ढवळे इ. पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने पदोन्नती मधील ३३ % टक्के आरक्षण रद्द केल्याबद्दल सरकाला जाब विचारण्यासाठी आपली कर्मचारी संघटना म्हणून काय रणनीती असावी यासाठी सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कर्मचारी संघटनांनी आंदोलन करून, मोर्चे काढून पदोन्नती आरक्षण परत कसे मिळेल यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी आरक्षण हक्क कृती समितीच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे एक मत झाले. दिनांक २६ जून रोजी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी मंत्रालायावरती मोर्चा काढण्यासाठी ठाणे जिल्हयात ज्या कर्मचारी संघटना कार्यरत आहेत. त्या सर्वानी जास्तीत जास्त कर्मचारी, पदाधिकारी मुंबईला नेण्यासाठी एक मत झाले.
यावेळी किरण काटे, नीलकलम मेश्राम, सुनील संदानशिव, कमलाकर वांगीकर, दादासाहेब शिंदे, संजय थोरात यांनी आपले मोलाचे विचार मांडले .
0 Comments