सुशिक्षित तरूणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग 
समाज प्रबोधनासाठी करणे गरजेचे - अमरकुमार तायडे

मुंबई/प्रतिनिधी :

दिवा (ठाणे) येथे संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऒफ इंडिया (आठवले) या पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष एकनाथ भगत, रिपब्लिकन पक्षाचे दिवा शहर अध्यक्ष दिनेश पाटील, नगरसेवक दिपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते अडसुळे बाबा, भारतीय संविधान अभ्यासक अमरकुमार तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अमरकुमार तायडे म्हणाले, सुशिक्षित तरूणांनी आपली विद्वता समाजाच्या उपयोग आणली पाहिजे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज कल्याणासाठी केला पाहिजे हेच महापुरूषांच्या हे अभिवादन ठरेल. छ.शाहू, महात्मा फुले, डॊ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा दिवा शहरात पुढे घेऊन जाण्याचे काम दिवा शहरातील संयुक्त जयंती उत्सव कमिटी करत आहे. कार्यक्रमासाठी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एकनाथ भगत, उपाध्यक्ष विश्‍वास भालेराव, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, प्रमुख संघटक बालाजी कदम, सचिव विजय पवार, उपकार्याध्यक्ष अभिषेक जाधव, सहसचिव नितीन रिंगनेकर, सहसचिव नितीन वाघमारे, खजिनदार दिनेश जाधव, संघटक प्रमुख मिलिंद गवई, उपखजिनदार गंगाधर गायकवाड, संभाजी कदम, संघटक प्रदीप सकपाळ, सुशील महाडिक यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक जाधव, कोल्हापूर रहिवाशी संघटना अध्यक्ष एस.डी.पाटील, भारतीय मराठा संघ प्रकाश पाटील आणि सहकारी डी.के .खरात, गोपीनाथ गायकवाड, संजय जाधव, महेश गडानकुश, सिद्धार्थ गवई, सौ.निकिताताई सालप, सौ.स्वाती कांबळे, खजिनदार सौ.स्वाती जाधव, शारदा धनवे यांच्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.