छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद
छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठा
प्रतिसाद
जयसिंगपूर/प्रतिनिधी :
छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तर साप्ताहिक भीमयानच्या ब्लॊगला व्हिजिट करणार्यांच्या संख्या एका दिवसाला 1298 अशी होती. प्रश्नमंजुषा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्व प्रथम छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व महामानवांना अभिवादन करून राजर्षि छ. शाहू महाराज सोशल फौंडेशनचे अध्यक्ष पंकज झेंडे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. साप्ताहिक भीमयान व राजर्षि छ.शाहू महाराज सोशल फौंडेशनच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण 45 स्पर्धकांना पैकींच्या पैकी गुण मिळालेले होते. चिट्ट्या टाकून विजेता ठरविण्यात आले. यामध्ये तनिष्का अमित वाघवेकर हिचा हस्ते चिट्टी टाकून प्रथम क्रमांकाचे 1500 रूपये व प्रशस्तीपत्र अभिजित माळी यांना मिळाले आहे. अभिज्ञा अमित कोठावळे हिचा हस्ते चिट्टी टाकून द्वितीय क्रमांक 1000 रूपये व प्रशस्तीपत्र उल्का सुरेश कोळी यांना मिळाले तर त्रिग्या अमित वाघवेकर हिचा हस्ते चिट्टी टाकून तृतीय क्रमांकाचे 500 रूपये व प्रशस्तीपत्र सुनिता अलगुडे यांना मिळालेले आहे. सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र इमेल आयडीवर पाठविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास साप्ताहिक भीमयानचे संपादक अभिजित वाघवेकर, उपसंपादक अमित वाघवेकर, जाहिरात प्रतिनिधी नितिन कांबळे, प्रविण कांबळे, सचिन झेंडे, प्रज्वल कांबळे, अक्षय गदगडे उपस्थित होते. उमेश सावंत, सचिन सत्यनाईक, कर्णिक परिवार तसेच डॊ. अतिक पटेल यांनी या उपक्रमास आर्थिक सहकार्य केले आहे.
0 Comments