शाहू महाराज यांचा पोवाडा
शाहू महाराज यांचा पोवाडा
आधी नमन तथागताला,
चार्वाकाला,आणि कबीराला,
शिवरायाला, शंभू राजाला,
टाकुनी डफावर थाप २
पोवाडा गातो मी हो खास २
शाहुराजांची महती सांगण्यास २
शाहिरी सुरवात करतो खास
जी जी जी !!धृ!!
नमन माझे सावित्रीमाईला
क्रांतीबाला आणी जिजाऊला
बाबासाहेबांना, अण्णाभाऊला
वंदन करतो मातेला २
वंदन करतो पित्याला २
वंदन करतो जनतेला २
करतो सुरवात पोवाड्याला रं जी जी जी !!१!!
२६ जून १८७४ साली
जन्मला महाबली
गरिबांचा वाली
घाटगे घराण्यात जन्मला बाळ २
आनंदीबाईंनी केला प्रतीपाळ जी जी जी !!२!!
शाहुराजांची महती थोर
कुस्तीप्रेमी भारदस्त वीर
कोल्हापुरी फेटा डोईवर
साहेबी पोशाख शोभे छान २
जनता करीतसे गुणगान जी जी जी !!३!!
बहुजन जनता होती अडाणी
करावया जनतेस ज्ञानी
शिक्षण सक्तीचे केले खास
शिक्षण मोफत दिले सर्वांस
वंदनीय शाहु आम्हास जी जी जी !!४!!
स्त्री शिक्षणास राजाज्ञा केली
आंतरजातीय लग्ने लावीली
सर्वांची शाळा एक केली
ज्ञानगंगा करवीरी आणली
सोसुनी सनातनी विरोधास जी जी जी !!५!!
राधानगरी धरण निर्मीले
कोल्हापुरी वसतीगृह वसवले
कल्याणकारी राज्य बनवीले
लोकराजा नाव सार्थक केले
दिले हक्क अधिकार समाजास जी जी जी !!६!!
मार्च १९२० साली
भेटले दोन महाबली
एक शाहु दुसरे भीमराव
परिषद होती माणगाव
पुढारी बनवले भीमराव
शाहु राजांचा हा घाव
बसला वर्मी सनातनी डोक्याव जी जी जी !!७!!
वेदोक्त प्रकरण गाजले
सनातनी टिळक खवळले
वादविवाद प्रचंड गाजले
शाहु राजे पुरून उरले
उतरला सनातनी माज जी जी जी !!८!!
६ मे १९२२ साली
जागृतीची मशाल विझली
दैना दैना चौमुलखी झाली
हरपला जनतेचा वाली
काळाने घातला कसा हा घाव
कवी सतीश जपतो शाहुंचे नाव जी जी जी !!९!!
कवी सतिश भारतवासी
कोल्हापूर
0 Comments