मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती व आरक्षण कायम ठेवण्यासाठी जिल्हाभर निवेदने
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती व आरक्षण कायम ठेवण्यासाठी जिल्हाभर निवेदने
गारगोटी / यशवंत सरदेसाई :
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या वतीने दि. 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी व एकाच वेळी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्ताने ही निविदन देण्याचे निश्चित केले होते.
शाहू महाराज यांनी 26 जून 190 2 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय जनतेला 50 टक्के आरक्षणाची घोषणा करून तातडीने अंमलबजावणी करणेबाबत आदेश जारी केला होता. सदर आरक्षण मध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण, तसेच उद्योगधंद्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत संस्थानातील संबंधितांना सूचना दिल्या होत्या. शिक्षण घेणाऱ्या सर्व जातीच्या विद्यार्थ्याकरिता जात निहाय विद्यार्थी वसतिगृहची निर्मिती केली होती. त्या काळातील दलित समाजातील लोकांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिली. शिवाय इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण असणाऱ्याना अधिकारी पदाच्या नोकऱ्या वकिलांचा सनदा दिल्या. देशातील एकूण साडेपाचशे संस्थानिका पैकी मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज हे करवीर संस्थानाचे एकमेव संस्थानिक होते. त्यामुळे 26 जून हा त्यांचा जन्मदिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाला तालुका व जिल्हा वार निवेदन देण्यात आली. भुदरगड तालुक्यातील निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी जिल्हा मार्गदर्शक यशवंत सरदेसाई, संजय कांबळे, तालुकाध्यक्ष सदानंद म्हेतर, कार्याध्यक्ष सखाराम कांबळे, कोषाध्यक्ष विजय कांबळे, सरचिटणीस पी.डी. कांबळे, सदस्य प्रकाश यादव इत्यादी उपस्थित होते.
तसेच माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी नामदेव कांबळे, (महासचिव कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य), गौतम वर्धन *जिल्हाध्यक्ष), संजय कुर्डूकर (जिल्हा सरचिटणीस), तुकाराम संघवी (कार्याध्यक्ष) पी.डी. सरदेसाई (कोषाध्यक्ष), बाळासाहेब कागलकर (जिल्हाध्यक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,) बाळासाहेब कागलकर (जिल्हाध्यक्ष,) सुधाकर कांबळे ( जिल्हाध्यक्ष जी.प.कोल्हापूर) प्रताप तराळ (जिल्हाध्यक्ष एसटी महामंडळ) नंदू चौगुले (जिल्हाध्यक्ष महानगरपालिका कोल्हापूर), ए.एस.कांबळे (जिल्हा संघटक) तानाजी घसते, जिल्हा मार्गदर्शक, डी. एस. कौशल (सदस्य ) विद्या मंदिर बालिंगा चे मुख्याध्यापक श्री सुखात्मे सर व सर्व जिल्हा सदस्य उपस्थित होते. तसेच प्रत्येक तालुक्यातील कास्ट्राईब शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यामध्ये कागलचे अध्यक्ष- रमेश कांबळे, राधानगरीचे अध्यक्ष- राजेंद्र कांबळे, आजरा अध्यक्ष -सुनील कामत, विजय कांबळे, पन्हाळा अध्यक्ष जी.के. कांबळे, शाहू वाडी चे अध्यक्ष -सदाशिव कांबळे, शिरोळचे अध्यक्ष- जे .के. कांबळे, हातकणंगले- दिलीप कांबळे, चंदगड चे के.सी. कांबळे गडिंग्लज चे भिमराव तराळ,मधुकर जरळी, पन्हाळ्याचे जी.के. कांबळे, सोरटे व सर्व कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments