दलित वस्तीसुधार योजनेतून हसुर बुद्रुकसाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर
दलित वस्तीसुधार योजनेतून हसुर बुद्रुकसाठी
तीन लाख रुपयांचा निधी मंजूर
कागल/प्रतिनिधी :
हसुर बुद्रुक (ता.कागल) येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता आणि गटार बांधकामसाठी शिवसेनेच्या समाज कल्याणच्या सभापती स्वाती सासणे यांच्या जिल्हा परिषदेतील फंडातून तीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
येथील दलित वस्तीतील मुख्य रस्ता ते समाज मंदिरपर्यंतचा डांबरीकरण रस्ता व रस्त्यांच्या दुतर्फा गटारी असे बांधकाम करण्यात येणार असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, सरपंच दिग्विजय पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम साळुंखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, माजी सरपंच बाबुराव भोसले, रंगराव भोसले, पत्रकार अशोक कांबळे (सर) यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बजरंग जाधव, विनायक भक्ते, मोहन गुरव, दत्तात्रय कांबळे, संभाजी कांबळे, संजय कांबळे, मिलन महेकर, दयानंद कांबळे, मंगल महेकर, अंतू कांबळे, विजय किडक, प्रदीप कांबळे, संदीप कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments