कोरोना काळातील कर्जाचे हप्ते माफ करा : अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेची मागणी
कोरोना काळातील कर्जाचे हप्ते माफ करा :
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी -
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघचे संस्थापक अध्यक्ष ऎड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकार्यांना कर्जाचे हप्ता माफ करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, आण्णासाहेब पाटील, महात्मा फुले महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, इतर मागासवर्ग महामंडळ व अन्य महामंडळांचे उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनेक लाभार्थ्यानी कर्ज घेतले. पण गेल्यावर्षीच्या कोरोना महामारी आणि पावसाळ्यात आलेले महापुर यामुळे तसेच यावर्षीही पुन्हा कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे सर्वत्र लॊकडाऊन करण्यात आला होता. अनेकांच्या रोजगार बुडाले, उद्योग व्यवसाय बंद झाले, अनेक व्यावसायीक अडचणीत आले असून त्यांना पुढे व्यवसायास प्रगती करण्यासाठी कोरोना काळातील हप्ते माफ करावेत, व्यावसायिक व नागरिकांना दिलासा द्यावा.
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटने कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे, जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, महिला शहर अध्यक्षा फरजाना नदाफ, शहर अध्यक्ष भारत कोकाटे, शहर कार्याध्यक्ष दिलीप रणदिवे, महिला शहर उपाध्यक्षा शबाना मुजावर, जिल्हा सचिव प्रभाकर माने, शहर महिला कार्याध्यक्षा राणी गायकवाड, नजमा मोकाशी, संभाजी कागलकर, प्रविण माने यांच्या मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments