शुरवीर मावळ्यांचा अपमान थांबवा - माधव भाले
शुरवीर मावळ्यांचा अपमान थांबवा - माधव भाले
नगर/प्रतिनिधी -
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या शुरवीर मावळ्यांचा आज सर्वांना च विसर पडला आहे. नुसता विसरच नाही तर हॉटेल च्या आणि लग्नमंडपाच्या प्रवेश द्वारावर मवाळयांची वेशभूषा केलेले तरुण स्वागतासाठी उभे करून हिंदवी स्वराज्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या शुरवीर मावळ्यांचा अपमान केला जातो. तो आपमान थांबला पाहिजे. यासाठी सर्व शिवभक्तांनी शासनावर दबाव आणला पाहिजे. नरवीर शिवाजी काशीद यांच्या बलिदान दिवसानिमित्त वडगाव को येथील जिवाजी महाले चौकात अभिवादन करण्यात आले.
यावेळी नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माधव भाले यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध जातीधर्माच्या शुरवीर मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले, या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली , त्यापैकी एक म्हणजे नरवीर शिवाजी काशीद हे होय. पन्हाळगडावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी शिवाजी काशीद या मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजाचे रुप घेऊन सिद्धी जोहर शी तह करण्यासाठी गेला , आपुन घेतलेले सोंग जेव्हा उघडकीस येईल तेव्हा आपल्याला ठार मारनार हे माहित असूनही शिवाजी काशीद हा मावळा छत्रपती महाराजांचे सोंग घेवून जातो. यातच या मावळ्यांची स्वराज्याप्रती निष्ठा दिसून येते. पण आजची पिढीया शूरवीर मावळ्यांचा त्याग, बलिदान आणि पराक्रम विसरले असून उटल हॉटेल आणि लग्नकार्यात मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण स्वागतासाठी उभे करून या मावळ्यांचा अपमानच करत आहेत. यावेळी नाभिक सेवा संघाचे संस्थापक माधव भाले , नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख नगर हर्षद विनायक शिर्के पाटील, आबासाहेब बोरुडे , भारत खटले , आबासाहेब तोडकर , माणिक सोनटक्के , बळीराम भाले , विष्णू मोरे , पवन भाले यांची उपस्थिती होती.
0 Comments