मांगुर, बारवाड, कारदगा, गावाना दुधगंगा पाण्याचा धोका, वाढला. नागरिकांचे स्थलांतर सुरु, दुधगंगा नदीत ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग , पाणी पातळी सात फुटाने वाढली.
मांगुर, बारवाड, कारदगा, गावाना दुधगंगा पाण्याचा धोका, वाढला.
नागरिकांचे स्थलांतर सुरु, दुधगंगा नदीत ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग , पाणी पातळी सात फुटाने वाढली.
कारदगा (प्रशांत कांबळे) :
मुसळधार पावसामुळे दूधगंगा ,वेदगंगा नदी काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पूराच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीत होत असल्याने मांगुर ,बारवाड, कारदगा ,गावाना संभाव्य धोका ओळखुन सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीजवळील वस्तीत पाणी शिरल्याने नदीकाठावरील नागरांकाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.पावसाची सुरू असलेली संततधार व कोणत्याही क्षणी काळम्मवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग होवु शकतो .त्यामुळे मोठा धोका ओळखुन नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत व महसूल विभागाने केले आहे.
सध्या काळम्मवाडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असुन ४८०मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.दुधगंगा नदीत ३४ हजार क्युसेक पाणी पाणलोट क्षेत्रातुन येत असुन दुधगंगा नदीकाठावरील मांगुर,बारवाड ,कारदगा ,जनवाड,तर वेदगंगा नदीवरील भिवशी, जत्राट, सिदनाळ, ममदापूर,हुन्नुरगी,भोज कुन्नुर गावाना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
काळम्मवाडी व पाटगाव धरणातुन वेदगंगा दुधगंगा नदीत पावसाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काळमवाडी धरणाची पाणी क्षमता ही २५.३९ टीएमसी इतकी असुन १७.५५टीएमसी पाणीसाठा सध्या झाला आहे .त्यामुळे धरण-६९% टक्के भरले आहे .दुधगंगा वेदगंगा नदीमध्ये पावसाचे ३४हजार आणि विद्युत हाऊस मधुन१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सदलगा येथे पाणी पातळी २.५३.मीटर असुन आज सात फूटानेक्षपाणी पातळी वाढली आहे.पावसाचे व पूराचे पाणी रस्त्यावर आल्याने कारदगा बारवाड रस्ता ,ढोणेवाडी कारदगा, रेंदाळ व बोरगाववाडी रस्ता बंद झाला होता.
कारदगा, बारवाड, मांगुर, जनवाड येथील नागरिकांचे स्थलांतर.....
दुधगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीवर आल्याने आज सकाळपासूनच नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत होते .कारदगा येतील सुतार वेस ,दलित वस्ती, खराडे उगळे,गल्ली कचरे गल्ली या वसाहतींमधील अनेक कुटुंबाचे व जनावरांना सरकारी प्राथमिक मराठी शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे. बारवाडातील दलित वस्ती, लोहार गल्ली ,व नदीच्या काठावर असलेल्या कुटुंबाना सरकारी शाळा व आंबेडकर भवन मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. मांगुर येथील नदीकाठावरील प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी पशु दवाखाना पाण्यात गेल्याने साहित्य हलविण्यात आले.नदीकाठावरील दलित वस्ती व अन्य घरामध्ये पाणी शिरल्याने कुटुंबाना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे .जनवाड मधील शेतवाडीतील जनावरे व कुटुंबाना नदीकाठावरील सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सदस्यांचा कुटुंबाना हलविण्यासाठी पुढाकार ........
कारदगा येथील पूरग्रस्तांना हलविण्यासाठी काल रात्रीपासून ग्रामपंचायत सदस्य, व अनेक युवकांनी परीश्रम घेवुन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष, सुदिपसिंह उगळे, राजु खिचडे, राहुल रत्नाकर, किरण टाकळे , प्रकाश शिंगे यांच्या सह अन्य सदस्यानी सहभाग घेतला होता.
विरोधी गटाचे सदस्य यानीही कुटुंबाना हलविण्यात मोलाची कामगिरी बजावली. प्रापचिंक साहित्य, जनावरे, भांडी, व इतर साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी नितेश खोत,तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, देवाप्पा देवकते, बाबासाहेब खराडे,सुकुमार माळी, सोमनाथ गावडे,धनपाल चव्हाण,बाबासाहेब खोत, यांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.तर बंद पडलेला विद्युत पुरवठा पूराच्या पाण्यात पोहत जावुन सोमनाथ गावडे व अभय खराडे यांनी सुरू केला.कुटुंबाना नेण्यासाठी वाहनांची सोय दोन्हीही गटानी केल्याने नागरिकांची चांगली सोय झाली. गंजी केंद्रात त्या कुटुंबाच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
.
0 Comments