बोधेगावमध्ये अण्णा भाऊंचे स्मारक उभारावे-सुनिल सकट स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन
बोधेगावमध्ये अण्णा भाऊंचे स्मारक उभारावे - सुनिल सकट
स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अस्थी त्यांचे खुप जवळचे सहकारी शाहीर अमर शेख यांनी बोधेगाव येथे जतन केल्या. याच भूमीवर शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी अहमदनगर नगर शहराचे सामाजिक चळवळीतील नेते सुनिल सकट,काँग्रेस कमिटीचे नगर तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे,कवी मिलिंद कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप ससाणे, भगवान मिसाळ, प्रा. अशोक शिंदे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आपले विचार मांडताना सुनिल सकट म्हणाले की,क्रांतीचे नवचैतन्य निर्माण करणारी एक अनोखी कला म्हणजे शाहिरी आहे.शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देऊन तसेच तळागाळातील उपेक्षित दुर्बल घटकांच्या उन्नती साठी संघर्ष करणाऱ्या शाहीर अण्णा भाऊंच्या कार्य कर्तृत्वाची आठवण भावी पिढीला व्हावी यासाठी अण्णा भाऊंचे स्मारक महत्त्वाचे असुन शासनाने लवकरात लवकर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारावे.
0 Comments