शिरदवाडमध्ये तंटामुक्त अध्यक्ष निवड कधी?

शिरदवाड/प्रतिनिधी :

शिरदवाड (ता.शिरोळ) गावाला तंटामुक्त अध्यक्ष निवड होणार कधी? असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे. 

गावाला तंटामुक्त अध्यक्षाची गरज असते. गावातील तंटे मिटवणे, समाजा-समाजामध्ये सामंजस्य, सलोखा राखण्याकरिता तसेच लहान-मोठे तंटे सोडविण्याकरिता मध्यस्थीची, तंटामुक्त अध्यक्षाची गरज असते. मात्र सध्यस्थितीला शिरदवाड गावाला तंटामुक्त अध्यक्षच नाही. परिणामी या गावातील तंटे कोण सोडविणार? असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे. गावामध्ये शांतता, सुव्यवस्था, सलोखा राखण्यासाठी लवकरात लवकर तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.