शिवाजी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात पाली, 
प्राकृत भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर, कोर्सेस तात्काळ सुरु करा

शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात पाली, प्रक्रित भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर / विभाग व यासंबंधित कोर्सेस तात्काळ सुरु करावे अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी राज्यपाल तसेच कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

 

 

-         शिवाजी विद्यापीठ येथील २२० प्राध्यापकांच्या रिक्त पदे तात्काळ भरावे,

-         शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातच व्हावे

-         विद्यापीठ अंतर्गत SC ST Prevention of Atrocities Act 1989  कायद्या विषय माहिती, जनजागृती, संशोधन या कामी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत Certificate Course सुरु करण्यात यावे. तसेच या कायद्याबाबत WorkshopSeminarAwareness Campaign

-         काही महाविद्यालयाकडून लँबोरेट्री फी, ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, विद्यार्थी खेळ व क्रीडा निधी, वैद्यकीय तपासणी शुल्क, विद्यापीठ क्रीडा व सांस्कृतिक शुल्क, अभ्यासोत्तर उपक्रम, वैद्यकीय तपासणी अर्ज शुल्क इत्यादी आकारण्यात आलेले आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात यावे व अशा संबंधित महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई व्हावी

-         अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्याबाबत सेल स्थापन करावा.

 

 

सांगली दि. ११ :

 

शिवाजी विद्यापीठ येथील २२० प्राध्यापकांच्या रिक्त पदे तात्काळ भरावे,

 

शिवाजी विद्यापीठ येथे एकूण २२० प्राध्यापकांची पदे आहेत. ९० प्राध्यापक सध्या कार्यरत आहेत. १३० प्राध्यापकांचे रिक्त पदे आहेत तर ७८ कंत्राटी प्राध्यापक आहेत. कंत्राटी प्राध्यापक यांची मुदत दि. ३० जून २०२१ रोजी संपलेली आहे.  विद्या विभूषित असणाऱ्या तरुण-तरुणींना अजूनही कंत्राटी तत्त्वावरच काम करत आहेत. त्यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम सुविधाही मिळत नाही. कंत्राटी पद्धत मुळे या उच्च शिक्षित प्राध्यापकांची योग्य तो सन्मान होत नाही. कंत्राटी पद्धत ही वेठ्बेगारी तसेच आरक्षण व संविधान विरोधी आहे. यामुळे कंत्राटी तसेच सीएचबी (तासिका तत्वावरील) भरती बंद करून विद्यापीठातील १३० प्राध्यापकांचे रिक्त पदे प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच १०० बिंदुनामावली आणि विषय / विभाग निहाय आरक्षण धोरण राबवून तात्काळ भरण्यात यावेत. 

 

 

शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात पाली, प्रक्रित भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर / विभाग व यासंबंधित कोर्सेस तात्काळ सुरु करावे

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रमाणेच शिवाजी विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात पाली, प्रक्रित भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर / विभाग व खालील कोर्सेस तत्काळ सुरु होणेबाबत.

 

-         MA ( Pali and Buddhist Studies)

-         MPhil (Pali)

-         BA (Pali )

-         MA (Pali and Buddhist Studies)

-         MA (Pali)

-         MPhil (Pali)

-         MPhil (Prakrit)

-         Diploma in Pali and Buddhist Studies

-         Diploma in Prakrit

-         Certificate Course in Pali

-         Certificate Course in Buddhist Studies

-         Certificate Course in Prakrit

- Diploma / Certificate Course in Indian Constitution.

 

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे जपान, चायना, थायलंड, सिंगापुर, मलेशिया यासह युरोपियन, अमेरिका, आशिया, आफ्रिका या खंडातून पाली व प्रक्रित भाषा व बुद्धिस्ट स्टडीचे कोर्सेस करण्यासाठी / शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग येत असतात. प्राचीन इतिहास असणारा बौद्ध धम्म, बौद्धकालीन लेण्या या संपूर्ण देशात तसेच भारताबाहेर ही आढळतात.  शांततेचा, मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांचा विचारांची खरी गरज आज या देशाला आहे. जिल्हा सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील बौद्ध कालीन लेण्या व त्याचा इतिहास आजरोजी ही पहावयास मिळतो.

 

 

याचे जतन व याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, त्यामुळे वरील मागण्याचा तत्काळ विचार होऊन याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून योग्य ती परवानगी मिळवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.

 

 

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत SC ST Prevention of Atrocities Act बाबत कोर्स सुरु व्हावा:

राज्यातील व देशातील वाढते अनुसूचित जाती-जमाती वरचे जातीय अन्याय- आत्यचार  पाहता व याबाबत SC ST Prevention of Atrocities Act 1989, Protection of Civil Rights 1955 या कायद्याची प्रभावी अमलबजावणी, कायद्या विषय माहिती, जनजागृती, संशोधन या कामी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत Certificate Course सुरु करण्यात यावे. तसेच या कायद्याबाबत WorkshopSeminarAwareness Campaign नियमित आयोजित करण्याबाबत विद्यापीठाने पुढाकार घ्यावा ज्यामुळे या समाजातील जातीय विषमता कमी होण्यास व पिडीताना न्याय मिळण्यास मदत होईल.


अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्याबाबत सेल स्थापन  करावा.

UGCAICTE च्या नियमानुसार विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयात अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्याबाबत सेल स्थापन करण्याबाबत आदेश आहेत. जीवन कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, लेखन अभिहास्तांकन आणि सादरीकरण तसेच स्थानिक भाषांचे वर्ग यावर नियमित उपचारात्मक प्रशिक्षण वर्ग घेणे तसेच या सेलद्वारे विद्यार्थ्यासह त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यासंदर्भात संवाद साधण्यासाठी सत्रे आणि अनौपचारिक बैठक आयोजित करण्याबाबत, विद्यार्थ्यांना विविध सवलती , योजना बाबतची म्यँनुअल तयार करणे, आदी नमूद आहे. परंतु सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या बहुतांश महाविद्यालयाकडून या AICTEUGC च्या आदेशाला मूठमाती देण्यात आली आहे. तरी अशा महाविद्यालयांवर कारवाई व्हावी. याची प्रभावी अमलबजावणी करिता तत्काळ आदेश पारित करावेत.

 

 

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरात व्हावे:

सांगली जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ संल्गन असणाऱ्या आर्ट्स, सायन्स, काँमर्सचे एकूण ५७ महाविद्यालयांपैकी २६ महाविद्यालय हे सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत तसेच शहराच्या २५ किलोमीटरच्या हद्दीत आहेत. यासोबतच जिल्ह्यातील बीएड, एमएड, एमफिलच्या १० पैकी ७ महाविद्यालय महानगरपालिका हद्दीत तसेच २५ किलोमीटरच्या आत आहेत.

 

बँचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, एमपीईडचे एकमेव कॉलेज देखील मनपा क्षेत्रात आहे. जिल्ह्यातील विधी शाखेचे केवळ दोन कॉलजेस एन.एस सोटी व भारती विद्यापीठ लाँ कॉलेज हे देखील सांगली शहरातच आहेत. विद्यापीठाशी सल्गन असणाऱ्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानबाबतचे ३ कॉलेजेस पैकी २ कॉलजेस सांगली शहरात व जवळपास आहेत. आर्किटेक्चरच्या दोन कॉलेजपैकी एक कॉलेज सांगली शहरात आहे.  फार्मसीबाबतचे ५ पैकी ३ कॉलेज सांगली शहरात आहेत. विद्यापीठाशी सल्गन असणाऱ्या इंटिग्रेटेड कोर्सेस एमबीए, एमसीए बाबतचे एकमेव कॉलेज हे सांगली-मिरज रोडवर आहे. शिवासादन रिनिवेबल रिसर्च केंद्र हे देखील सांगली शहरात आहे. फूड प्रोसेसिंग, पर्यटन, मेडिकल लँबोरेटरी बाबतचे कोर्सेस असणारे केवळ दोन महाविद्यालय असून ते देखील मनपा हद्दीत मध्ये तसेच सांगली शहरा नजीक आहेत.

 

एकंदरीत जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ सलंग्न असणाऱ्या विविध कोर्सेसचे  एकूण ८२ मधील ४६ महाविद्यालय हे सांगली शहरात तसेच शहरा नजीक आहेत. यामुळे या कॉलजेस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे क्लासेस, हॉस्टेल, अभ्यासिका वर्ग, ग्रंथालय हे देखील सांगली शहरातच मोठ्या प्रमाणात आहेत. सांगली, मिरज , कुपवाड शहर मनपा क्षेत्रात दळणवळण, अत्याधुनिक सेवा -सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातच व्हावे.

 

विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरापासून ५०- १०० किलोमीटर दूर नेणे पूर्णतः अव्यवहार्य ठरणार आहे. २०१४ मध्ये विद्यापीठ उपकेंद्र समितीने खानापुरात सुमारे ९५ एकेर व पेड्मध्ये सुमारे १०० एकर जागेची पाहणी करून अनुकूलता दर्शवली आहे. उपकेंद्र करिता बस्तवडे तालुका तासगाव येथील जागेला तत्वत: मंजुरी देताना शासनाने निकष डावल्याचे स्पष्ट झाले आहे व हा निर्णय नियमबाह्य आहे. बस्तवडे येथे दळणवळण व इतर सुविधा उपलब्ध नाहीत.

 

उपकेंद्र सांगली शहरात व्हावे यासाठी स्वतः विद्यापीठानेच पुढाकार घेतलेला होता. उपकेंद्र समितीचे अध्यक्ष, सदस्य यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.  त्यानंतर फेब्रवारी २०१६ मध्ये जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात सांगलीपासून २५ किलोमीटरच्या परिघात ७५ ते १०० एकर जागेची मागणी केली होती. मात्र सध्या बस्तवडेचे हवाई अंतर २५ किलोमीटर दाखवून तत्वता: मंजुरी दिली आहे.

 

याला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूंच्या मान्यतेसाठीचे पत्र दि.०६.०७.२०२१ रोजी सादर झाले आहे.  विद्यापीठाने राजकीय दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांचा, दळणवळणाचा, अत्याधुनिक सुविधांचा विचार करून सांगली शहरातच (मनपा हद्दीत) शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यात यावे.

 

 

बेकायदेशीर फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई व्हावी :

शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये विद्यार्थ्यांनी कोविड १९ च्या काळात ऑनलाईन शिक्षण पूर्ण केलेले असून सुद्धा काही महाविद्यालयाकडून लँबोरेट्री फी, ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, विद्यार्थी खेळ व क्रीडा निधी, वैद्यकीय तपासणी शुल्क, विद्यापीठ क्रीडा व सांस्कृतिक शुल्क, अभ्यासोत्तर उपक्रम, वैद्यकीय तपासणी अर्ज शुल्क इत्यादी आकारण्यात आलेले आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात यावे व अशा संबंधित महाविद्यालयांवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दि. ३०.०६.२०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्णयाला मूठमाती देण्याचे काम होत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. मा. कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ यांनी याबाबत तत्काळ लेखी आदेश पारित करावे. शिवाजी विद्यापीठ संलग्न सर्वच महाविद्यालयांना याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

 

वरील मागण्याचे निवेदन रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी राज्यपाल तसेच कुलगुरू यांच्याकडे  सादर केले आहे.

 

 अमोल वेटम, संघटना प्रमुख, रिपब्लिकन स्टुडंट युनियन

मो ९७६५३२६७३२