समता सैनिक दलाच्या सैनिकांनी लातूर येथील अन्यायग्रस्तांना दिली भेट

लातूर/प्रतिनिधी-

लातूर जिल्ह्यामध्ये शत्रुघ्न लहू कांबळे यांच्यासह कुटुंबातील दोन महिला व 4 वर्षाच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील समता सैनिक दलाच्या सैनिकांनी लातुर जिल्ह्यातील केळगाव (ता.निलंगा) येथील अन्यायग्रस्तांना भेट दिली. त्या दरम्यान त्यांची मुलाखत घेऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. बौद्ध समाजावर अन्याय करणार्‍यांच्या विरोधात पोलिस व उपविभागीय अधिकारी डॊ. दिनेश कोल्हे यांना भेटून गुन्हेगारांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणातील 3 पुरुष व 2 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन पुरुष आरोपी अद्याप फरार आहेत. यावेळी तेथील पोलीस अधिकारी यांनी योग्य सहकार्य करून फरार आरोपींना तत्काळ अटक करून अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आश्‍वासन दिले. या शिष्टमंडळात समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, यवतमाळ जिल्हा ट्रेनिंग आँफिसर विवेक कांबळे, मार्शल पप्पू पाटील, मार्शल आकाश कांबळे, मार्शल अरहंत सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.




त्या अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या छेडखानी व विनयभंगाची त्वरीत चौकशी करा..
पोलिस अधिक्षक वर्धा यांच्याकडे केली लेखी तक्रार; समता सैनिक दलामुळे प्रकरण उघडकीस 


वर्धा/प्रतिनिधी -

कंत्राटी कामगार म्हणून सामान्य रुग्णालय, वर्धा येथे लँब टेक्निशियन या पदावर काम करीत असलेल्या अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या छेडखानी व विनयभंगाची चौकशीच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक वर्धा यांना लेखी तक्रार समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली.

पिडित महिलेची ड्युटी सामान्य रूग्णालयामध्ये होती. त्या लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. संबंधित हॊस्पिटलमध्ये जगताप नामक व्यक्तीने त्यांच्यावर छेडखानी व विनयभंगाचा प्रकार केल्याची माहिती संबंधित मागासवर्गीय महिलेने समता सैनिक दलाला दिली. महिलेची तक्रार ती मागासवर्गीय असल्यामुळे कोणीही घेण्यास तयार नसल्यामुळे समता सैनिक दलाने या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे त्या पिडीत महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे. 

संबंधित प्रकरण उघडकीस न आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून संबंधित पिडित महिलेला धमकी ही दिली जात आहे, अशी माहिती समता सैनिक दलाने दिली असून लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा समता सैनिक दल लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.