भर पावसात पुणे, नागपूर येथे प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस - अमोल वेटम, प्रमुख, रिपब्लिकन स्टुडंट युनियन

सांगली/प्रतिनिधी-

राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयातील रखडलेली प्राध्यापक, सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा व इतर अनुषंगिक मागण्यासाठी पुणे येथील उच्च शिक्षण संचालक व नागपूर येथील सह संचालक कार्यालय, संविधान चौक येथे १९ जुलै रोजी बेमुदत आंदोलन छेडण्यात आले आहे.  राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापक, सहा.प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, प्राध्यापक भरतीसाठी प्रचलित विषय व विभाग निहाय आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे, अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षक संवर्गातील राखीव जागांचा अनुशेष प्रचलित १०० बिंदुनामावली नुसार तात्काळ भरण्यात यावा, तासिका तत्वावरील अर्थात सीएचबी तसेच कंत्राटी धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा, राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान देण्यात यावे. एमपीएससी मधून  लेक्चरर पदाची भरती तात्काळ करा, आदी मागण्याबाबत प्राध्यापक भरती लक्षार्थ आंदोलन तर्फे भर पाऊसात हे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.

पुण्यातील आंदोलनात प्राध्यापक भरती लक्षार्थ आंदोलनाचे राज्य समन्वयक डॉ. किशोर खिलारे, प्रा. राहुल भास्कर, प्रा. प्रविण कड, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे,  प्रा. प्रकाश नाईक, प्रा. स्नेहल साबळे, प्रा. सुधाकर अहिरे, प्रा. चारुशीला तासगावे, प्रा. डॉ. सुदर्शन माने, प्रा. ज्ञानेश्र्वर सावळे, प्रा. संजय साबळे, डॉ. संतोष भोसले, प्रा. सुधाकर अहिरे, प्रा. प्रतिक खेडेकर आदी उपस्थित आहेत.

नागपूर येथील आंदोलनात डॉ. कपिल पाटील, प्रा. गौतम पाटील, प्रा. नितीन गायकवाड, प्रा. नितेश मेश्राम, डॉ. लखन इंगळे, आदी उपस्थित आहेत.

अनेक संस्था, संघटनांचा यांनी जाहीर पाठिंबा तसेच आपला प्रत्यक्ष सहभाग मोठ्या संख्येने नोंदवत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे .