अण्णा भाऊंच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी - राकेश जगधने
अहमदनगर (प्रतिनिधी) : शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, पीडित, उपेक्षित, दुर्बल घटकांच्या वेदना साहित्यात मांडनाऱ्या अण्णा भाऊंच्या लिखाणात क्रांतीच्या ठिणग्या दिसून येतात.अशा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सिंहाचा वाटा असणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्याचे २७ भाषेत भाषांतर झाले असून सातासमुद्रापार छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती पोहचवनारे व मराठी भाषेचा झेंडा फडकविणारे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी सकल समाजाची आहे,असे प्रतिपादन राकेश जगधने यांनी केले.लोकप्रबोधनकार विद्रोही साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम महालक्ष्मी तरुण मंडळाच्या वतीने संपन्न झाला.प्रथमतः अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साठे दादा,रमेश पवळ,राकेश जगधने,श्याम साळवे, प्रदीप वावरे, सोनू वाघमारे,निलेश गायकवाड, भारत साठे,साहिल वाघमारे, हरीश नन्नवरे,निलेश अडागळे,कुमार गायकवाड, गणेश गाडे,राजु नन्नवरे,करण वाघमारे,गौतम अडागळे,किसन साठे आदींसह समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदीप वावरे म्हणाले की,ज्या प्रमाणे अण्णा भाऊंनी साहित्य संपदा निर्माण केली त्या प्रमाणे त्यांची प्रेरणा घेऊन तरुणांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे.
0 Comments