औरंगाबाद येथील भाजप जनआशीर्वाद रॅली मध्ये घुसून केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांना ऑल इंडिया पँथर सेना तर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर.
औरंगाबाद येथील भाजप जनआशीर्वाद रॅली मध्ये घुसून केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांना ऑल इंडिया पँथर सेना तर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर.
संविधान जिंदाबाद, भाजप, महाआघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला, पोलिसांची मुस्कटदाबी
औरंगाबाद/प्रतिनिधी दि. २१ : पेट्रोल दरवाढ कमी करणे बाबत, घरगुती गॅस दरवाढ कमी करणे बाबत, महिलांचे मुद्रा लोन माफ करणे बाबत, महापुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र कोकण साठी 10 हजार केंद्रीय पॅकेज जाहीर करणे बाबत. अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचा निधी 7000 करोड रुपये निश्चित करणे बाबत व इत्यादी मागण्यां बाबत केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांना ऑल इंडिया पँथर सेना प्रदेश प्रवक्ते बंटी सदाशिवे, पूर्वशहर अध्यक्ष रोहित कांबळे,पूर्व शहरउपाध्यक्ष विशाल नावकर मध्यशहर अध्यक्ष कपिल गायकवाड,आकाश नगराळे,अमोल भुईगड निवेदन सादर केले.
देशात आर्थिक नाकेबंदीसारखी, आर्थिक आणीबाणी सारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे. केंद्र सरकार आर्थिक धोरण ठरवण्यात सपशेल अपयशी ठरलेलं आहे. महागाईने कंबरडे मोडले आहे, लॉकडाऊन कोरोना मुळे गरीब माणूस उद्धवस्त झाला आहे. बेरोजगारी, कर्जबाजारी आणि त्यात बँकेच्या वसुलीचा तगादा यामुळे गरीब आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.
पेट्रोल 110 रुपये प्रति लिटर झालं आहे, गॅस 1000 च्या वर गेला ,महापुराने पश्चिम महाराष्ट्र कोकण उद्धवस्त झाला आहे, माणसं डोंगरा खाली दबून मेलीत, संसार उघड्यावर आहेत, माणसांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे असंवेदनशील व्यवस्थेचा व अशावेळी काढलेल्या जनाशीर्वाद यात्रेचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करते.
मागण्या :-
1) पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ तात्काळ कमी केली पाहिजे.
2) कोरोनामुळे उदयोग धंदे बंद झाले आहेत, केंद्राची स्कीम असलेलं 5 लाखांपर्यंतचे मुद्रा लोन तात्काळ माफ करावे.
3) पश्चिम महाराष्ट्र, कोकण मुंबई महापुरग्रस्त भागातील अनुसूचित जाती जमातीला केंद्राकडून पुनर्वशनासाठी घर व 10 लाखांची तात्काळ मदत करणे बाबत.
4) महापुरग्रस्त भागाला 10000 हजार करोडचे केंद्रीय पॅकेज जाहीर करावे.
5) अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती 7000 करोड नियोजित करावी. जातीयेतेतून 988 करोडची केलेली कपात निंदनीय आहे.
6) गेली दोन वर्षे हाताला काम नाही, नौकऱ्या गेल्यात, रिक्षा चालकांचे आयुष्य उद्धवस्त झालंय. सक्तीच्या बँक वसलीमुळे आत्महत्या वाढल्या आहेत. तात्काळ सक्तीची बँक वसुली थांबवून न्याय द्यावा.
वरील मागण्या माणसांच्या जीवनाशी निगडित असून महागाईमुळे हताश परिस्तिथी झालेली आहे. आर्थिक आणीबाणीतून देशाला वाचवा अन्यथा रस्त्यावर उतरून जनउठाव केला जाईल. असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
संविधान जिंदाबाद, भाजप, महाआघाडी सरकार मुर्दाबाद असे नारे देत भाजपच्या या जन यात्रेत घुसून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हुकुमशाही धोरण राबवत या कार्यकर्त्यांना अटक केले, याचा सर्वत्र निषेध होत आहे, ही मुस्कटदाबी आम्ही खपवून घेणार नाही असे विविध आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे. पोलीस यंत्रणा महाआघाडी सरकारचे गुलाम आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे , कोरोना फोफावत असताना अशा जन यात्रा यांना परवानगी मिळतेच कशी याची चौकशी व्हावी.
0 Comments