गडहिंग्लज येथे निर्भय मॉनिंग वॉक
गडहिंग्लज येथे निर्भय मॉनिंग वॉक
अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या 8 स्मृतिदिनानिमित्त आयोजन
चंदगड/रूपेश मऱ्यापगोळ) :-
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गडहिंग्लज शाखेकडून निर्भय मॉनिंग वॉक करून दाभोळकरांना आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी महाराणी राधाबाई कॉलेजमार्गे, विरशैक बँक, नेहरू चौक व दसरा चौकातील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन निर्भय वॉकची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ.दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ह्या सारख्या विचारवंतांच्या हत्येने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. पी.एम.भोईटे, प्रा.सुभाष कोरे, अशोकराव मोहिते, बाळासो मुल्ला, गणपतराव पाटोळे, काटे सर, बाळेश नाईक, तानाजी कुरळे, ॲड. सयाजीराव पाटील, इंजि. एस.डी. राजाराम, रेखा पोतदार, सुनिता नाईक, प्रा. साताप्पा कांबळे, प्रा.पी.डी. पाटील, उज्वला दळवी, प्रा.ज्ञानराज चिघळीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
0 Comments