बौद्ध कुटुंबीयांचे जेसीबी ने घर पाडले, स्वातंत्र्यदिनीच कुटुंबियांचे पाडलेल्या जागेवर आंदोलन, अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ 

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखी एक घटना, जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करूनही काहीही कारवाई नाही, आरोपी मोकाट , ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची आक्रमक भूमिका.

कवठेमहांकाळ :

जिल्हा सांगली तालुका कवठे महांकाळ म.पो.आगळगावत येथील बौद्ध महिला कुटुंबीयांचे जातीवादी लोकांकडून जेसीबी ने घर पाडले. नुकतेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा झाला, आजही दलीत अन्याय अत्याचार थांबलेले नाही. बौद्ध कुटुंबियांचे पाडलेल्या जागेवर आंदोलन सुरू केले. अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखी एक घटना सांगली जिल्ह्यात घडलेली आहे, पिडीताने जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करूनही काहीही कारवाई नाही, आरोपी मोकाट आहेत.

बौद्ध कुटुंबीयांचे  राहते घर जेसीबी ने जमिनोदस्त करून बेघर सहकुटुंब आंदोलनास बसले. आरोपीवर अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित महिलेकडून करण्यात आली तरीही अजून गुन्हा दाखल केलेला नाही. कवठे महांकाळ पोलिसांकडून आवाज दाबला जात आहे. या अन्यायग्रस्त कुटुंबाने न डगमगता घडलेल्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, समाजीक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख यांचेकडे पुन्हा तक्रार अर्ज पाठवला आहे. त्यांच्या तक्रार अर्जातील आशय असा की आगळगाव हद्दीतील हाराळे वस्ती येथे नामदेव कबीरा कांबळे यांचे मालकीचे घर जबरदस्तीने विजय तुकाराम माळी याने काही लोकांना हाताशी धरून जेसीबी च्या साहाय्याने जमिनोदस्त करून दलित कुटुंबियांना बेघर केले आहे, आरोपी विजय माळी हा या परिसरातील मोठा बार व हॉटेल चालक आहे, घर पाडल्यामुळे कांबळे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत सदर घटनेची तक्रार दिली पण तरीही पोलिसानी या घटनेकडे गांभिर्याने पाहिले नाही त्यानंतर या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे न्यायाच्या अपेक्षेने तक्रार अर्ज दिला, पण यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

जागेचा रितसर उतारा, घरपट्टी भरलेली पावती दाखवूनही कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे कागदपत्रे चुकीची आहेत म्हणून  या पीडित महिलेचा आवाज दाबला. स्वांतंत्र होऊन ७५ वर्ष झाले तरी अनुसूचित जाती, आदिवासी, बौद्धांवर अन्याय अत्याचाराचे सत्र सुरूच आहे.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जातीय अत्याचारबाबत ते मौन बाळगून आहेत. सांगली जिल्ह्यात जवळपास आजरोजी ४०० हून अँट्रॉसिटीचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत. 

या घटनेचा जाहीर निषेध करत बेजबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांसह आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक व्हावी, पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी, पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे विकी वाघमारे, अमर कांबळे,  स्वप्नील खांडेकर, आदींनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केलेली आहे.