अत्याचारित पीडित बौद्ध कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे धरणे आंदोलन - 

ऑल इंडिया पँथर सेना, बळीराजा संघटना, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या जाहीर पाठिंबा

सांगली दि.२९ : 

जिल्हा सांगली तालुका कवठे महांकाळ म.पो.आगळगावत येथील बौद्ध महिला कुटुंबीयांचे जातीवादी लोकांकडून जेसीबी ने घर पाडले. नुकतेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा झाला, आजही अनुसुचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार थांबलेले नाही.  स्वतंत्र दिनी पीडित कुटुंबियांनी या पाडलेल्या जागेवर आंदोलन सुरू केले. अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ करत आहेत. पिडीताने जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करूनही काहीही कारवाई नाही, आरोपी मोकाट आहेत. या अन्यायग्रस्त कुटुंबाने न डगमगता घडलेल्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, समाजीक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख यांचेकडे पुन्हा तक्रार अर्ज पाठवला आहे पण यावर ही काहीही कारवाई न झाल्याने  सोमवार दि. ३० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पीडित कुटुंब आंदोलन छेडणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन प्रमुख अमोल वेटम, स्वप्नील खांडेकर यांनी  दिली.

या आंदोलनास ऑल इंडिया पँथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन, बळीराजा संघटना आदींचा जाहीर पाठिंबा आहे .