आगळगाव बौद्धांचे घर उध्वस्त प्रकरण: अखेर विजय माळी सह इतर आरोपींवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन, ऑल इंडिया पँथर सेनेचा कायद्याचा दणका


सांगली दि.३१: जिल्हा सांगली तालुका कवठे महांकाळ मु.पो.आगळगावत बौद्ध कुटुंबीयांचे राहते घर जातीवादी लोकांनी जेसीबी ने पाडले, स्वातंत्र्यदिनीच कुटुंबियांचे पाडलेल्या जागेवर आंदोलन केले होते. अँट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ होत होती. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखी एक घटना सांगली जिल्ह्यात घडली.  दि.३०.०८.२०२१ पासून पिडीत कुटुंबातील नामदेव कांबळे, वर्षा कांबळे, विठ्ठल कांबळे, मंगल कांबळे हे छावणी आंदोलनास जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत आंदोलनास बसले होते. याबाबत दि.३०.०८.२०२१ रोजी पिडीत कुटुंबांनी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे स्वप्नील खांडेकर यांनी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना लेखी निवेदन सादर करून आरोपींवर कारवाईची मागणी केले, याची दखल घेत तत्काळ उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांना कारवाई करणेबाबत कळविले. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने यावर कारवाई करत कवठे महांकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यास सांगितले.



गेल्या काही दिवसापासून पिडीत बेघर कुटुंब न्याय मागण्यासाठी शासन दरबारी दररोज वाऱ्या करत असून संबंधित आरोपींवर प्रशासन कारवाई करत नाही अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात व सोशल मीडियाद्वारे सुरु होती. दि.३०.०८.२०२१ रोजी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश येणार का ? पीडितांचे मागणी मान्य होणार का ? आरोपींवर कारवाई होणार का ? अशा चर्चांनी जोर धरला होता मात्र रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन व ऑल इंडिया पँथर सेनेने कायद्याचा दणका दिला. अखेर दि.३१.०८.२०२१ रोजी आरोपी  विजय माळी, शोभा माळी यांच्यासह ४ ते ५ अनोळखी लोकांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत पिडीत बौद्ध महिला मंगल नामदेव कांबळे हिने कवठे महांकाळ पोलीस ठाणे येथे FIR ०३२२/२०२१ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१, ४४७, ४४८, ४६१, ४२७, १४३, १४९, ५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या कलम ३(१)(f),(g),(r),(s),(z), (va) तसेच  महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार  विजय माळी, शोभा माळी यांच्यासह ४ ते ५ अनोळखी लोकांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे स्वप्नील खांडेकर, तानाजी जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे मुकेश सरोदे यांनी दिली. या आंदोलनास बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते, मनोहर रास्ते, आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संतोष आठवले, अजित सगरे, समीर विजापुरे, यांच्यसह विजय कांबळे यांना पाठींबा दिला.