कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशा पासून कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नये

अकोला :- 

राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि महाराष्ट्र शासन चुकीच्या धोरणामुळे कृषी तंत्रनिकेतन (3 वर्षी) विद्यार्थ्यांना या वर्षीपासून कृषी पदविका प्रवेश नाकारण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर ती एक प्रकारची बंदी आणलेली आहे. अभियांत्रिकी शाखेतील शिक्षणा प्रमाणेच कृषी पदविका केल्यास कृषी पदविका द्वितीय वर्षाला प्रवेश मिळत असल्यामुळे दहावीनंतर , अकरावी , बारावी न करता विद्यार्थी कृषी पदवीकेला प्रवेश घेतात परंतु आता विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आलेली आहे..

तसेच या निर्णयानंतर कृषी पदवीकेच्या शैक्षणिक वर्ष 2018-2021 या विद्यार्थ्यांना कृषी पदवीला प्रवेश नाकारण्यात आला आहे.. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे सन 2017-2020 या शैक्षणिक वर्षात ज्या  विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र निकेतन (कृषी पदविका) हा अभ्यासक्रम पूर्ण करून कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आहे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम  व सन 2018-2021 या बॅचच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समान आहे तरीसुद्धा या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे..

राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील 107 कृषी तंत्र निकेतन मधील जवळपास 6420 विद्यार्थ्यांचा कृषी पदविका प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कृषी पदविकेच्या 2018-2019 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना यावर्षी कृषी पदवी ला प्रवेश मिळाला पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे याबाबत  आज अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.. यावेळी अंकुश श्रीकृष्ण तायडे, संकेत जगताप व आशिष सोनोने उपस्थित होते.