खुलताबाद येथे श्रावण पौर्णिमा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने साजरी
खुलताबाद येथे श्रावण पौर्णिमा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने साजरी.
खुलताबाद (प्रतिनिधी ) : खुलताबाद पौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा खुलताबाद च्या वतीने 41 वी पौर्णिमा बुद्ध वंदना घेऊन उपासक, उपासिका यांनी पांढरा वस्र परिधान करून विनंम्र आभिवादन करण्यात आले.
तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धाने महाभयंकर ताकदवर आहिंसक (अंगुलीमाल) यास याच पौर्णिमेपासुन उद्धार झाल्याचे उदाहरण आहे. कारण श्रावस्तीच्या रहदारीच्या रस्त्यावर एक क्रुर हत्यारा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भितीने घाबरवून सोडत असल्याने लोक भयभीत झाले होते. तो अंगुलीमाल याच पौर्णिमेला शरण आलेला आहे ही बौद्ध अनुयायाने अंगिकारले पाहिजे. बौद्ध विचारात मानशिक जिवन हे क्षणभंगुर आहे हे शिद्ध होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीचा लढा लढतांना जसे तथागथाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. बुध्द हे माणसाच्या जीवनात दु:ख मुक्तीचा मार्ग तथागथाने भिक्षापात्र अंगिकारला आहे. कारण काश्यवस्र परिधान करून बुध्दाने जगात धम्ममार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे हा संदेश दिला गेला आहे.
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष रतन घुसळे, उपाध्यक्ष कारभारी ढवळे, सचिव राजअनंत सुरतकर, मुरलीधर रगडे, फकिरराव भालेराव, भाऊराव गवळे, संजय जाधव कारभारी ढिवरे, श्रावण घुसळे, शेखनाथ दाणे, सटवा गवळे, सुधाकर गवळे, विलास गडकरी. विनोद रगडे, सागर रगडे, किरण राऊत, विजय सदावर्ते, कारभारी गवळे, तसेच खुलताबाद पौर्णिमा उत्सव समितीच्या महिला पदाधिकारी लक्ष्मीबाई वाहुळ, गयाबाई गवळे, राधाबाई सदावर्ते, नंदाबाई गवळे इतर महिला पुरूष मोठ्या प्रमाणात हजर होते.
0 Comments