भारतात 2020 मध्ये जातीय आणि धार्मिक दंगलीच्या आकडेवारीत दुप्पटीने वाढ : एनसीआरबी

मुंबई/प्रतिनिधी : 

नॅशनल क्राईम रेकॊर्ड ब्युरोनुसार सन 2020 मध्ये जातीय आणि धार्मिक दंगलींच्या प्रकरणात सन 2019 च्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्यावर्षी कोविड-19 महामारी संबंधीत प्रतिबंधांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली असून सुध्दा यासंबंधीत प्रकरणांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याची दिसून आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या नॅशनल क्राईम रेकॊर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की, देशात 2020 मध्ये जातीय आणि धार्मिक दंगलीचे एकूण 857 प्रकरणे नोंद झाली आहेत.

रिपोर्टनुसार 2019 मध्ये यासंबंधीत प्रकरणांची संख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 438 होती तर सन 2018 मध्ये 512 अशी होती. रिपोर्टमध्ये एनसीआरबीने असे म्हटले आहे की, कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान 25 मार्च 2020 ते 31 मे 2020 पर्यंत देशात पूर्ण लॊकडाऊन लागू होता आणि या कालावधीत सार्वजनिक स्थळांवर बंदी घालण्यात आली होती.

देशात गेल्यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात आंदोलने करण्यात आली होती आणि यादरम्यान दिल्लीमध्ये दंगली झाल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर मार्चमध्ये कोविड-19 महामारीचा प्रकोप सुरू झाला होता. उत्तर-पूर्वी दिल्लीमध्ये नागरिकता संशोधन कायदा (सीएए) च्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसेनंतर 24 फेबु्रवारी 2020 ला जातीय दंगली सुरू झाल्या. ज्यामध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक लोकांना दुखापत झाली होती.  वृत्तसंस्था पीटीआईच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये जातीय संघर्षाचे 736 प्रकरणे नोंद केली गेली होती. तर 2019 मध्ये 492 आणि 2018 मध्ये 656 अशी होती. सन 2020 मध्ये धार्मिक संघर्ष श्रेणीनुसार 167 प्रकरणे नोंद केली गेली होती. सन 2019 मध्ये 118 हून अधिक आणि सन 2018 मध्ये 209 प्रकरणे नोंद केली गेली होती. सन 2020 मध्ये देशभरात ‘सार्वजनिक शांती भंग करणे‘ या संदर्भात एकूण 71,107 प्रकरणांची नोंद झाली होती तर सन 2019 मध्ये 63,262 प्रकरणांची नोंद झाली होती. या तुलनेत अशा प्रकरणामध्ये सन 2020 मध्ये 12.4% वाढ झाली आहे.

या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 2,188 प्रकरणे भूमीसंबंधीत श्रेणीच्या अंतर्गत दाखल केले गेले तर 1,905 ‘विरोध किंवा प्रदर्शनाच्या दरम्यान दंगा करणे’ या प्रकरणामध्ये दाखल केले होते. सन 2020 मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत दाखल झालेल्या ‘सार्वजनिक शांती भंग करण्याच्या’ एकूण गुन्ह्यांमध्ये (51,606) दंगलींच्या प्रकरणांचा 72.6% हिस्सा होता. महत्वाची बाब म्हणजे एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार कोरोना महामारीचे प्रभावीत वर्ष 2020 मध्ये गुन्ह्यांची प्रकरणे 28% वाढली आहेत. नॅशनल क्राईम रेकॊर्ड ब्युरो (एनसीआरबी) द्वारा जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2020 मध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणे प्रमुख गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये राहिले आहे. एकूण 66,01,285 गुन्हें नोंद केले गेले. ज्यामध्ये आईपीसी अंतर्गत 42,54,356 प्रकरणे आणि विशेष तथा स्थानिक कायद्यांतर्गत 23,46,929 प्रकरणांची नोंद केली गेली आहे. यासह एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशामध्ये फेक न्यूज आणि अफवाहांच्या प्रकरणांमध्ये 214% ची वाढ झाली आहे. सन 2020 मध्ये फेक न्यूजची 1,527 प्रकरणे नोंद केली गेली. तर सन 2019 मध्ये 486 आणि सन 2018 मध्ये 280 प्रकरणांची नोंद केली गेली होती. या प्रकरणांच्या तुलनेत सन 2020 मध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.