सोशल मिडीयावर १७ सप्टेंबर 'जुमला दिवस' म्हणून साजरा
सोशल मिडीयावर १७ सप्टेंबर 'जुमला दिवस' म्हणून साजरा
दर वर्षी दोन करोड नौकरी देण्याबाबत मोदींनी फसवले : अमोल वेटम
सांगली दि. १७:
दि. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय जुमला, बेरोजगार दिवस म्हणून सोशल मिडियातून साजरा करण्यात आला व बेरोजगार तरुणांनी आपला संताप व्यक्त केला. प्रधानमंत्री मोदींनी प्रत्येक वर्षी दोन करोड रोजगार देण्याचे जाहीर केले होते, तथापि आज ७ वर्ष पूर्ण झाली, एकूण १४ करोड बेरोजगार युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. याउलट देशात ४५ वर्षातील बेरोजगारीचा उच्चांक गाठला कोट्यावधी युवकांच्या नोकऱ्या गेल्या. एनसीआरबीच्या आकडेवारी नुसार २०१६ ते २०१९ पर्यंत रोजगार न मिळाल्याने तरुणांमध्ये आत्महत्याचे प्रमाण २४ टक्केने वाढले आहे. केवळ ऑगस्ट या महिन्यात सीएमआईएच्या आकडेवारीनुसार बेरोजगारी दर हा ८.३२ टक्के आहे. ऑगस्टच्या एका महिन्यात संघटीत व असंघटीत क्षेत्रातील १५ लाख हून अधिक लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. ग्रामीण भारतातून १३ लाख हून अधिक लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. तर एकीकडे झपाट्याने होत असलेले खासगीकरण तसेच ६ लाख कोटी रुपयांच्या सरकारी कंपन्याचे खासगीकरण करून नोकऱ्या, आरक्षण समाप्त केले आहे व लाखो लोकांना बेरोजगार करण्यात आले आहे.
स्कील इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनेचा फज्जा उडलेला आहे. यासोबतच राज्य सरकारने देखील सत्तेत येताच सर्व शासकीय सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते पण ते देखील जुमलाच ठरले. एकंदरीत भारत सरकार राज्य सरकार हे बेरोजगार तरुणांच्या बाबत गंभीर नाहीत. यासोबतच देशाचे वार्षिक बजेट हे ३४ लाख करोड इतकेच असताना प्रधानमंत्री मोदी हे लाल किल्ल्यावरून रोजगार निर्मितीसाठी १०० लाख करोड देण्याचे भाषणातून सांगतात, आत्मविश्वासाने एवढे खोटे बोलणारा व्यक्ती जगाच्या इतिहासात नाही. हे विधान देखील बेरोजगार तरुणांचा जाहीर अपमान आहे, याचा आम्ही निषेध करतो असे रिपब्लिकन स्टुडट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम म्हणाले.
0 Comments