अखेर महावितरण कडून शेतकऱ्याचे वीज कनेक्शन झाले मंजूर : अमोल वेटम

एनडी.एससीपी योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन बाबत या योजेअंतर्गत लाभ घ्यावा.
रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या दणक्याने महावितरण जागे झाले 

मिरज दि. २१ : एनडी.एससीपी योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबतची योजना महावितरण कडून रविवण्यात येते. मिरज तालुका येथील अनुसूचित जातीचे शेतकरी दिलीप अप्पा खांडेकर यांनी मालगाव सेक्शन ऑफिस एमएसईबी येथे रीतसर अर्ज डिसेंबर २०२० रोजी केला होता. पुढील आठ महिने यावर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती. याबाबत पीडित व्यक्ती दिलीप खांडेकर यांनी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांच्याकडे दाद मागितली. यानुसार अमोल वेटम, स्वप्नील खांडेकर यांनी महावितरण अधिकारी ( Dy. Executive) यांची भेट घेतली व आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर महावितरण यांनी तत्काळ कार्यवाही करत या शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन बाबत रुपये ४३,१२४ इतके रक्कम मंजूर करून घेतली. यामुळे देशाचा कणा असलेल्या  शेतकऱ्याला लाईटीचा मार्ग सुकर झाला. यामुळे शेताला पाणी पाजणे आता सोयीस्कर होईल.

एनडी.एससीपी योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन बाबत या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन विद्युत अभियंता अमोल वेटम यांनी केले