राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये गौरी कांबळे दुसरी तर आदित्य पाटील व अथर्व शिंदे यांची महाराष्ट्र एअरगन शूटिंग स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये गौरी कांबळे दुसरी तर आदित्य पाटील व अथर्व शिंदे यांची महाराष्ट्र एअरगन शूटिंग स्पर्धेसाठी निवड
गांधीनगर (वसगडे) /प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य एअरगन अँड फायरआर्मस शूटिंग कॉम्पिटिशन वाशी नवी मुंबई व पुणे खडकी येथे भरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गांधीनगर निगडेवाडी येथील ड्रीम ओलंपियन शुटींग क्लब च्या गौरी काबळे हिने १० मीटर एअर रायफ़ल वैयक्तिक या प्रकारात ४०० पैकी ३८४ गुण मिळवत सेकंड रँन्क मिळवला व पुढे होनार्र्या ऑल इंडिया जी.वी.मावलंकर शूटिंग चॅम्पियनशिप अहमदाबाद गुजरात या राष्ट्रीय स्पर्धे साठी तीची निवड झाली आहे. अकॅडमीच्या आदित्य पाटील यांनी ४०० पैकी ३४८तर अथर्व शिंदे यांने ४०० पैकी ३४३ असे गुण मिळवत पात्रता फेरी पूर्ण केली. व त्यांची पनवेल नवी मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र एअर गन शूटिंग स्पर्धेत निवड झाली आहे. हे तिघेही
गाधीनगर निगडेवाडी येथील ड्रीम ओलंपियन १० मीटर शूटिंग अकॅडमीमध्ये सराव करीत आहेत. अकॅडमीच्या कोचप्रशिक्षक अनुराधा खुडे या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले तसेच व्यवस्थापक समीर मुलाणी, संदीप कांबळे, आर .बी .पाटील , रवींद्र शिंदे या सर्वांचे प्रोत्सहन लाभले.
मुलान मध्ये अशाच कलागुणांना वाव देण्य्यासाठी पालकानी पुढे येऊन त्याना अशा अनेक वेगवेगल्या खेळामध्ये प्रावीण्य्य मिळवुन देण्य्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे मत ड्रीम ओलंपियन शूटिंग रेंजच्या अंतरराष्ट्रीय खेळाडू अकँड्मीच्या कोच अनुरधा खुडे यानी स्पष्ट केले आहे. निगडेवाडी येथील नेमबाजी प्रशिक्षण सेंटर ला भेट देऊन रायफ़ल शूटिंग व पिस्तूल शूटिंग या खेळाविषयी माहिती करुन घ्यावी व नेमबाजी प्रशिक्षण घेण्य्यासठी आपला सहभाग नोंदवावा असे मत समीर मुलाणी यानी व्यक्त केले.
0 Comments